Valentine दिवशी आलियासारखा चेहऱ्यावर ग्लो हवाय? ट्राय करा हे फेस मास्क
कोरफडीचा गर व गुलाब पाणी मिक्स करुन फेस मास्क तयार करा. कोरफडीमुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होते. याशिवाय गुलाब पाण्यामुळे त्वचा उजळ होते.
ओट्स, मध व दही एकत्रित मिक्स करून एक पेस्ट तयार करा. फेस मास्क चेहऱ्याला लावल्याच्या 15-20 मिनिटांनी स्वच्छ धुवा. यामुळे तुमचा चेहरा तजेलदार आणि चमकदार होईल.
स्मॅश केलेल्या पपईत मध मिक्स करून पेस्ट तयार करा. पपईत व्हिटॅमिन ए, सी गुणधर्म असतात जे त्वचेला चमक देतात. याशिवाय मधामुळे त्वचा मॉश्चराइज होते.
एक ॲव्होकॅडो घेऊन स्मॅश करून घ्या. यामध्ये दही मिक्स करून एक पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर पेस्ट 15-20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने फेस मास्क स्वच्छ धुवा.
स्मॅश केलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये दही मिक्स करून पेस्ट तयार करा. फेस मास्क चेहऱ्यावर 15-20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने तो धुवा. यामुळे त्वचा एक्सफोलिएट आणि चमकदार होईल.
हळद व मध मिक्स करून पेस्ट तयार करा. स्वच्छ चेहऱ्यावर पेस्ट लावा. हळदीत अँटी इफ्लेंमेंटरी व अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचेला चमक देण्यास मदत करतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.