परीक्षेत नापास झाल्याने मुलं उदास आहे? आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालकांनी लक्षात ठेवा या 5 खास टिप्स

परीक्षेत नापास होणे आयुष्यातील अपयाशाच्या मार्गावरील एक टप्पा आहे. यामुळे परीक्षेत नापास झालेल्या मुलाला ओरडणे, मारण्याऐवजी पालकांनी समजून घेणे अत्यावश्यक आहे. जेणेकरुन मुलामधील आत्मविश्वास पुन्हा वाढला जाईल. याबद्दलच्याच काही खास टिप्स जाणून घेऊया…

Chanda Mandavkar | Published : May 21, 2024 5:30 AM IST / Updated: May 21 2024, 11:04 AM IST

5 Tips to Boost Confidence in Child: आज (12 मे) महाराष्ट्रातील 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल लागणार आहे. या परीक्षेसाठी राज्यातून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी परीक्षा देतात. त्यापैकी काहीजण उत्तीर्ण होतात तर काहीजण नापास. पण नापास झालेल्या मुलांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी बोर्डाकडून उपलब्ध करून दिली जाते. खरंतर, बहुतांश मुलांना परीक्षेत नापास होण्याची फार भीती वाटते. अशातच पालकांनी परीक्षेत नापास झालेल्या मुलाला ओरडणे, मारण्याऐवजी समजून घेतले पाहिजे. मुलाचा आत्मविश्वास कसा वाढेल याकडे पालकांनी लक्ष देण्यासाठी काही टिप्स जाणून घ्याव्यात.

मुलांमधील आत्मविश्वास वाढवणे सर्वाधिक महत्त्वाचे
परीक्षेत नापास झालेले बहुतांश विद्यार्थी आपण आयुष्यात हरलोय असा विचार करून टोकाचे पाऊल उचलतात. अशातच विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या बातम्या येतात. या प्रकाराला रोखण्यासाठी पालकांनी मुलांना समजून घेणे, मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आणि मुलाचा आत्मविश्वास वाढवणे अशा काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे.

मुलांमधील आत्मविश्वास कसा वाढवाल?

सकारात्मक विचार करण्यास सांगा
परीक्षेत नापास झालेल्या मुलाला नेहमीच सकारात्मक विचार करण्यास सांगा. मुलाला समजावून सांगा की, अपयश हे आयुष्यातील एक टप्पा आहे. यामधून काहीतरी शिकण्याऐवजी अनुभवाच्या दृष्टीकोनाने पहावे. स्वत:मधील क्षमता ओखळण्यास मुलाला सांगावे. याशिवाय अपयश हे दीर्घकाळ राहणार नसून अस्थायी स्थिती असल्याचेही मुलाला पालकांनी समजावून सांगावे.

भावनिक सपोर्ट द्या
मुलं परीक्षेत नापास झाल्याने उदास आणि निराश झाल्यास त्याच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. पालकांनी मुलाला काय वाटतेय याबद्दलही जाणून घ्यावे. याशिवाय पालकांनी मुलाला मनमोकळेपणाने त्याच्या मनातील भावना शेअर करण्यास सांगावे.

कठोर मेहनत करण्यास सांगा
कठोर मेहनत आणि दृढतेला महत्त्व देण्यासह गुणांएवजी प्रयत्नांवर अधिक जोर देण्यास मुलाला सांगावे. उत्तम गुण नव्हे तर प्रयत्न नेहमीच कामी येतात असेही पालकांनी मुलाला सांगावे.

लहान-लहान यशात आनंद माना
मुलाच्या लहान-लहान यशातही पालकांनी समाधान आणि आनंद मानला पाहिजे. खरंतर, यावेळी मुलाने केलेल्या प्रयत्नामुळेच त्याला यश मिळाल्याचे पालकांनी समजून घेतले पाहिजे. मुलामधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांचे वेळोवेळी कौतुक करणेही महत्त्वाचे आहे.

मुलाला प्रॅक्टिकल विचार करण्यासही सांगा
आयुष्यात यशाच्या मार्गावरुन जाताना अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो. यामुळे अपयश आल्याने हताश होण्याएवजी मुलाला पुन्हा प्रयत्न करण्यास सांगा. याशिवाय काही गोष्टींबद्दल प्रॅक्टिकल विचार करण्यासही सांगावे. जेणेकरुन भविष्यात मुलासमोर एखादे आव्हान असल्यास त्याचा सामना तो करण्यास सक्षम होईल.

आणखी वाचा : 

Career Tips : 12 वी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन, उजळेल भविष्य

विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, बारावीचा निकाल कुठे आणि कसा पाहता येणार?

Share this article