Career Tips : 12 वी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन, उजळेल भविष्य

| Published : May 21 2024, 10:05 AM IST / Updated: May 21 2024, 10:07 AM IST

Career Option After 12th Arts
Career Tips : 12 वी आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन, उजळेल भविष्य
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Maharashtra HSC Board Results 2024 : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेचा निकाल 21 मे ला अखेर जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजता निकाल लागणार आहे. अशातच आर्ट्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टॉप-10 करियर ऑप्शन कोणते याबद्दल जाणून घेऊया.

Career Option After 12th Arts : 12 वी आर्ट्सच्या शिक्षणानतर बहुतांश विद्यार्थ्यांना पुढचे करियर निवडावे यासंदर्भात कंफ्युजन असते. याशिवाय काही विद्यार्थ्यांसह पालकांना देखील बारावी आर्ट्सनंतरच्या करियरच्या संधी कोणत्या उपलब्ध असतात याची देखील फारशी माहिती नसते. अशातच आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी टॉप-10 करियर ऑप्शन कोणते आहेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

बीए इन सोशियोलॉजी (BA in Sociology) 
12 वी आर्ट्समधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही बीए इन सोशियोलॉजीचा पर्याय निवडू शकता. काही विद्यापीठांमध्ये बीए इन सोशियोलॉजीचा कोर्स उपलब्ध करून दिला जातो. सोशियोलॉजीमधून बीए केल्यानंतर विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी करुन शिक्षक होऊ शकतात.

बीए इन इकोनॉमिक्स (BA in Economics) 
आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना बीए इन इकोनॉमिक्सचा पर्यायही उपलब्ध आहे. या कोर्सनंतर विद्यार्थ्यांना एमबीए, पीएचडी अथवा स्वत:चा एखादा स्टार्ट अप सुरू करता येईल.

बीए इन इंग्लिश (BA in English)
बारावी आर्ट्सचे विद्यार्थी बीए इन इंग्लिश कोर्सचा पर्याय निवडू शकतात. यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतल्यास असिस्टेंट प्रोफेरसची नोकरी करू शकतात.

इवेंट मॅनेजमेंट (Event Management)
सध्याच्या काळात इवेंट मॅनेजमेंट क्षेत्रात मोठ्या नोकरीच्या संधी आहेत. इवेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना इवेंट मॅनेजर, वेडिंग प्लॅनर अशा काही गोष्टी शिकता येतील.

बॅचलर ऑफ मास मीडिया (Bachelor of Mass Media) 
12 वी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना करियर ऑप्शन निवडायचा असल्यास बॅचलर ऑफ मास मीडियाचा विचार करू शकता. यामध्ये मास्टर डिग्री घेतल्यानंतर एखाद्या जाहिरात कंपनीत अथवा पत्रकारिततेत नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे.

बॅचलर इन फॅशन डिझाइनिंग (Bachelor in Fashion Designing) 
बॅचलर इन फॅशन डिझाइनिंग कोर्सही बारावी आर्ट्सनंतर करता येऊ शकतो. काही कॉलेजमध्ये बॅचलर इन फॅशन डिझाइनिंगचा कोर्स उपलब्ध असतो. याशिवाय बॅचलर इन फॅशन डिझाइनिंगसाठी निफ्ट (NIFT) चा कोर्सही करता येऊ शकतो.

बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts)
बारावीनंतर विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ आर्ट्सचा पर्याय उपलब्ध आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

SSC ची तयारी (Staff Selection Commission) 
विद्यार्थ्यांना 12 वी नंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करता येऊ शकते. यासाठी काही स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

बीए एमबीए (BA MBA)
आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना बीए एमबीए करता येऊ शकते. पाच वर्षांच्या एमबीए कोर्स वेगवेगळ्या विद्यापीठात उपलब्ध आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना क्लॅटची परीक्षा देता येऊ शकते.

बीएएलएलबी (BALLB)
12 वी आर्ट्स विद्यार्थी बीएएलएलबीचे शिक्षण घेऊ शकतात. यानंतर वकीलची नोकरी करण्याची संधी उपलब्ध होते. देशभरात काही विद्यापीठात बीएएलएलबीचे शिक्षणाचा कोर्स उपलब्ध करून देतात. बारावीच्या विद्यार्थ्यांना करियरसाठी बीएएलएलबी देखील उज्वल भविष्यासाठी बेस्ट करियर ऑप्शन ठरू शकतो.

आणखी वाचा : 

First Job : पहिलाच जॉब आहे ? मग हे नक्की लक्षात ठेवा,कारण यामुळे…

कोकण रेल्वेमध्ये मोठी भरती, पाहा अधिक माहिती