रात्री लवकर जेवण केल्यास वजन कमी होत का, कारण जाणून घ्या
Lifestyle Feb 05 2025
Author: vivek panmand Image Credits:Getty
Marathi
रात्री लवकर जेवण केल्यावर वजन कमी होत
रात्री लवकर जेवण केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. अनेक संशोधन आणि तज्ज्ञांच्या मते, उशिरा जेवल्यास शरीरातील मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) मंदावतो आणि त्यामुळे चरबी साचते.
Image credits: Pinterest
Marathi
वजन कमी करण्यास मदत होते
लवकर जेवल्यास शरीराला पचनासाठी अधिक वेळ मिळतो, त्यामुळे फॅट स्टोअर्स होण्याऐवजी कॅलरीज जळतात. रात्री उशिरा जेवल्यास अन्न पूर्णतः न पचता चरबीच्या स्वरूपात साठते, त्यामुळे वजन वाढते.
Image credits: social media
Marathi
पचनतंत्र सुधारते
उशिरा जेवल्यास अन्न योग्य प्रकारे पचत नाही आणि गॅस, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या होतात. रात्री लवकर जेवल्यास शरीराला झोपेपूर्वी अन्न पूर्णतः पचवता येते.
Image credits: social media
Marathi
साखर आणि इन्सुलिन नियंत्रणात राहते
रात्री लवकर आणि हलके जेवल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. उशिरा जेवल्यास इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे साखर चरबीत बदलते आणि वजन वाढते.
Image credits: Pinterest
Marathi
चांगली झोप लागते
उशिरा आणि जड जेवण केल्यास झोपेत व्यत्यय येतो. लवकर जेवल्यास शरीर हलके वाटते आणि शांत झोप लागते.
Image credits: social media
Marathi
शरीरातील चरबी कमी होते
रात्री लवकर जेवण आणि नंतर १०-१२ तास काहीही न खाल्ल्यास Intermittent Fasting सारखा प्रभाव मिळतो. त्यामुळे शरीरातील Stored Fat जळते आणि नैसर्गिकरित्या वजन कमी होते.