National Sports Day : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्याबद्दलच्या खास गोष्टी
National Sports Day 2024 : हॉकीचे जादूगार म्हणून ओखळल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनाबद्दल आज (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. अशातच जाणून घेऊया मेजर ध्यानचंद यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
29 ऑगस्टला हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती साजरी केली जाते. याच दिवशी वर्ष 1905 मध्ये ध्यानचंद यांचा जन्म इलाहाबाद येथे झाला होता. हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो.
वयाच्या 16 व्या वर्षात सैन्यात भरती
ध्यानचंद वयाच्या 16 व्या वर्षीच सैन्यात भरती झाले होते. सैन्यात ध्यानचंद शिपाई म्हणून कार्यरत होते. येथूनच ध्यानचंद यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली होती. रात्रीच्या वेळेस ध्यानचंद हॉकीचा सराव करायचे. खरंतर, ध्यानचंद यांचे खरं नावे ध्यान सिंह होते.
हॉकीचे जादूगार
वर्ष 1928 मध्ये ऑलिम्पिंक स्पर्धेत भारताने सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी ध्यानचंद यांनी आपल्या हॉकी स्टिकने जादू चालवत 14 गोल केले होते. याच ऑलिम्पिंकच्या दमदार खेळीमुळे ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधण्यास सुरुवात झाली होती.
ध्यानचंद यांचा आठवणीत राहणारा सामना
ध्यानचंद यांनी भारताला हॉकीचे अनेक सामने जिंकवून दिले. पण आजही ध्यानचंद यांचा एक सामना नेहमीच आठवणीत राहतो. कलकत्ता कस्टम्स विरुद्ध झांसी हिरोजमधील बिगटन क्लबमधील अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात ध्यानचंद यांनी धमाकेदार कामगिरी करत चाहत्यांची मनं जिंकली होती.
हॉकीचे वेड
मेजर ध्यानचंद यांना हॉकी खेळ खूप आवडायचा. यामुळे झाडाचे लाकूड कापून त्यापासून हॉकी स्टिक तयार करायचे. शिक्षणापेक्षा ध्यानचंद यांना हॉकीच खेळणे सर्वाधिक पसंत होते.
लॉस एंजेलिस ऑलिम्पिंक सामना
वर्ष 1932 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिंकमध्ये भारताच्या संघाने अमेरिकेला एका सामन्यात 24-1 अशी मात दिली होती. यामध्ये ध्यानचंद यांनी 8 गोल केले होते.
हिटरने जर्मनी सैन्यासाठी विचारले
मेजर ध्यानचंद यांची उत्तम खेळी पाहता जर्मनीच्या हिटरलने त्यांना जर्मन सैन्यात दाखल होण्याची ऑफर दिली होती. पण ध्यानचंद यांनी भारतीय सैन्यातच राहण्याचा निर्णय घेतला.
खेल रत्न पुरस्कार
भारतात खेल रत्न पुरस्कार हा मेजर ध्यानचंद यांच्या नावे दिला जातो. याआधी पुरस्कार राजीव गांधी खेल रत्न नावाने दिला जात होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने वर्ष 2021 मध्ये पुरस्काराचे नाव बदलले.