या 5 संकेतांवरुन ओखळा शरीरातील प्रोटीनची कमतरता, उपायही वाचा
Proteins Deficiency in Body : उत्तम आरोग्यासाठी शरीराला प्रोटीनची आवश्यकता असते. यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास काही समस्या उद्भवू शकतात. याआधी शरीरात काही संकेत दिसतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
- FB
- TW
- Linkdin
)
शरीराला प्रोटीनची आवश्यकता
शरीरात प्रोटीनच्या माध्यमातून हिमग्लोबीन तयार होते, जे संपूर्ण अवयवयांपर्यंत पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पोहोवण्यास मदत करतेत. खरंतर, नखं ते केसांमध्ये प्रोटीन असते. आपल्या शरीरात 10 हजार प्रकारचे प्रोटीन असतात. यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
मूड बिघडतो
मूड बिघडल्यानंतर चिडचिड होणे, राग येणे अशा गोष्टी घडतात. याचा अर्थ असा होतो की, शरीरात प्रोटीनची कमतरता फार कमी आहे. आपल्या शरीरातील न्यूरोट्रांसमीटर प्रोटीनपासून तयार झालेले असतात. जे मेंदूचे मेसेज शरीरापर्यंत पोहोचवण्याचे काम करते. अशातच शरीरात प्रोटीन अधिक किंवा कमी झाल्यास मूड बदलला जातो.
अवयवांना सूज येणे
शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास किडनी सुरळीतपणे काम करत नाही आणि रक्तात पाण्याचे प्रमाण वाढले जाते. यामुळे शरीरातील वेगवेगळ्या अवयवांममध्ये सूज येणे किंवा फुगण्याची समस्या उद्भवली जाते. दरम्यान, शरीराला सूज येण्यामागे काही कारणे असू शकतात.
केस-नखं तुटणे
केस अत्याधिक प्रमाणात गळत असतील किंवा नखं सतत तुटत असल्यास शरीरात प्रोटीनची कमतरता दिसून येते. नखं, केसांमध्ये इल्साटिन, कोलेजन आणि कीरेटीन सारखे कम्पाउंड असतात जे प्रोटीनपासून तयार झालेले असतात.
थकवा जाणवणे
प्रोटीनच्या कमतरतेमुळे नेहमीच थकवा जाणवतो. एखादे काम करताना आळस येतो. अनेक दिवस थकल्यासारखे वाटत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
रक्ताची कमतरता
हिमग्लोबीनमध्ये प्रोटीन असते. यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास रक्तातील हिमग्लोबीन कमी होऊ लागते. अशातच अॅनिमिया या आजाराला बळी पडू शकता. या स्थितीत श्वास घेण्यासही समस्या उद्भवू शकते.
उपाय काय
- प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधा.
- डाएटमध्ये प्रोटीनयुक्त फूड्स जसे की, मासे, अंडी, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
- डेअरी प्रोडक्ट्सचे सेवन करा.
- ड्राय फ्रुट्स, सीड्सचे सेवन करा. याच्या माध्यमातूनही प्रोटीन मिळेल.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)