National Desk : आहारात छोटे-मोठे बदल करून वजन कमी केले जाऊ शकते. वाढत्या वजनामुळे लोक त्रस्त असतात. लोकं वजन घटवू इच्छितात, परंतु त्यासाठी जरा देखील मेहनत घेण्यासाठी तयार नसतात. अशातच जर तुम्ही देखील वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर केवळ बसून राहून काही होणार नाही, तर जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीत काही महत्वाचे बदल केल्यानंतरच पोटाची चरबी कमी केली जाऊ शकते. येथे अशाच एका मसाल्याची माहिती दिली जाणार आहे ज्याने पोटाची चरबी कमी होऊ शकते. हा मसाला म्हणजे मेथीचे दाणे. पिवळ्या मेथीच्या दाण्याचे पाणी कसे बनवले जाते, हे पाणी पिल्याने शरीराला काय फायदे मिळतात,पोटाची चरबी कशाप्रकारे कमी होते हे जाणून घेऊया.
मेथीच्या दाण्यात फायबर, व्हिटॅमिन तसेच लोह, मॅग्नॅशिअम आणि मॅग्नीज यासारखी खनिजे आढळतात. या दान्यांचे पाणी बनवण्यासाठी सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून पाणी उकळून घ्या. हे पाणी गाळून पाणी पिले जाऊ शकते किंवा भिजवलेले मेथीचे दाणे देखील खाता येतात. मेथीचे पाणी बनवण्याची आणखी एक पद्धत आहे. यासाठी मेथीच्या दाण्यांना एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजऊन सकाळी या पाण्याला हलके गरम करून प्यावे.
वजन कमी करण्यासाठी हे पाणी खुप गुणकारक आहे. याचे फॅट बर्निंग गुण वजन कमी करण्यात परिणामकारक ठरतात. याने भुक देखील कमी होते ज्यामुळे सतत काही खान्याची इच्छा होत नाही. कमी अन्न सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करण्याशिवाय मेथीचे पाणी पिल्याने शरीराला इतर देखील फायदे मिळतात. मेथीचे पाणी पिल्याने घातक कॉलेस्ट्ऱॉल कमी होण्यास मदत होते. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मेथीच्या दाहक विरोधी गुणामुळे शरीरातील जळजळ कमी होते. यामुळे गुडघे किंवा हात-पायात होणाऱ्या वेदनेपासून देखील सुटका होते.मेथीच्या दाण्याचे पाणी शरीरातून विषारी घटकांना बाहेर काढते.विषारी घटक बाहेर निघाल्याने त्वचेवर देखील याचे फायदे दिसून येतात. मेथीचे पाणी पिल्याने त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.शरीराची रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी देखील मेथी उपयुक्त आहे. केसांना देखील या पाण्यामुळे फायदे मिळतात. मेथीच्या पाण्याचे सेवन केल्याने केसांच्या वाढीस मदत होते. अँटिऑक्सिडंटयुक्त मेथी आजारांपासून शरीराला दुर ठेवते.
Disclaimer : वरील लेखातून केवळ साधारण माहिती दिली आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारे योग्य चिकित्सेचा पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. एशिया नेट न्युज वरील माहितीसाठी जबाबदारीचा दावा करत नाही.
हेही वाचा :
थंडीत घरच्याघरी तयार करा पौष्टिक अशी शेंगदाणा चिक्की, वाचा सोपी रेसिपी
थंडीत त्वचेला इंस्टेट ग्लो हवाय? चेहऱ्याला लावा हे 3 फेस पॅक