सार
थंडीच्या दिवसात आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे असते. अशातच थंडीत शरिराला आतमधून उष्ण ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन केले जाते. अशातच यंदाच्या थंडीच्या दिवसात घरच्याघरी पौष्टिक अशी शेंगदाणा-गुळाची चिक्की तयार करू शकता.
Peanut Chikki Recipe : थंडीच्या दिवसात खाण्यापिण्याच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार महत्वाचे अशते. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचे सेवन केले जाते. पण शरिराला आतमधून उष्ण ठेवणाऱ्या आणि पौष्टिक अशा फूड्सचे सेवन करावे. यासाठी गरम सूप, ताजे फूड्स आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. खरंतर, थंडीत गाजर हलवा, तीळाचे लाडू किंवा शेंगदाण्याची चिक्की अशा फूड्से सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
शेंगदाणा आणि गुळाचे आरोग्यदायी फायदे
शेंगदाण्याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शेंगदाण्याच्या सेवनाने शरिरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होणे, फायबर आणि प्रोटीन अशी पोषण तत्त्वे असल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. याशिवाय गुळामुळे पोटाची समस्या, स्नायूंचे दुखणे आणि शरिराला भरपूर प्रमाणात लोह मिळते. अशातच थंडीत शेंगदाणा आणि गुळापासून तयार करण्यात आलेल्या चिक्कीची सोपी रेसिपी पाहूया.
सामग्री
- 200 ग्रॅम शेंगदाणे
- 100 ग्रॅम गूळ
- 100 ग्रॅम तूप,
- एक टिस्पून तूप
- अर्धी वाटी पाणी
कृती
- सर्वप्रथम शेंगदाणे भाजून त्याची साल काढून टाका.
- गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये गूळ आणि दोन चमचे पाणी घाला. जेणेकरुन गुळाचा पाक तयार होईल.
- गुळाच्या पाकामध्ये एक चमचा तूप मिक्स करुन मिश्रण व्यवस्थितीत ढवळून घ्या.
- गुळाच्या पाकामध्ये भाजलेले शेंगदाणे घातल्यानंतर चिक्कीसाठी मिश्रण तयार होईल.
- एका ताटाला तूप लावून त्यामध्ये चिक्कीचे मिश्रण पसरुन ठेवा.
- मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला चौकोनी किंवा अन्य कोणताही आकार देऊन थोडावेळ ठेवा.
- मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर स्कॅन टाइमवेळी शेंगदाण्याची चिक्की खाण्यासाठी सर्व्ह करा.
आणखी वाचा :
महागड्या संत्र्याची साले फेकून देऊ नका, बनवा 5 उपयुक्त गोष्टी
वयाच्या 60 वर्षानंतर रहाल हेल्दी आणि फिट, लाइफस्टाइलमध्ये करा हे बदल