थंडीत Hair Mask मुळे सर्दी-खोकला होतो? वापरा या वस्तू

थंडीत केसांची काळजी घेण्यासाठी नारळाचे तेल, मध, ऑलिव्ह ऑइल अशा वस्तूंचा वापर केला जातो. याशिवाय केसांच्या आरोग्यासाठी हेअर मास्कही काहीजण लावतात. पण हेअर मास्कमुळे थंडीत सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवत असल्यास काय करावे हे जाणून घेऊया…

Winter Hair Mask : थंडीच्या दिवसात आंघोळ करण्याचा फार कंटाळा येतो. अशातच केसांची काळजी घेण्यासाठी हेअर मास्क लावणेही टास्क वाटतो. पण काही हेअर मास्क असे असतात की, ज्यामुळे डोक्याला थंडावा मिळतो. मेंगी, कोरफड किंवा दह्यापासून तयार करण्यात आलेला हेअर मास्क थंडीच्या दिवसात लावणे टाळले पाहिजे. यामुळे डोक्याला अधिक थंडावा लागून सर्दी-खोकल्याची समस्या उद्भवली जाऊ शकते. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात कोणत्या प्रकारचा हेअर मास्क केसांना लावणे सर्वाधिक उत्तम आहे याबद्दल सविस्तर...

नारळाचे तेल आणि मधाचा हेअर मास्क

थंडीच्या दिवसात नारळाचे तेल आणि मधाचा हेअर मास्क लावावा. यासाठी सर्वप्रथम दोन चमचे नारळाचे तेल कोमट गरम करुन त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. नारळाच्या तेलाचा आणि मधाचा हेअर मास्क केसांच्या मूळांना लावून हलक्या हाताने मसाज करा. अर्धा तासानंतर केसांना माइल्ड शॅम्पूने धुवा. या हेअर मास्कमुळे केस कोरडे होण्याची समस्या कमी होईल.

ऑलिव्ह ऑइल आणि केळ्याचा हेअर मास्क

केस अत्याधिक राठ किंवा कोरडी झाल्यास थंडीच्या दिवसात ऑलिव्ह ऑइल आणि केळ्याचा हेअर मास्क लावू शकता. यासाठी पिकलेले केळ स्मॅश करुन त्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करुन घट्ट पेस्ट तयार करुन घ्या. पेस्ट केसांना 20 मिनिटे लावून ठेवल्यानंतर केस स्वच्छ धुवा.

प्रोटीनयुक्त हेअर मास्क

केसांच्या मजबूतीसाठी थंडीत अंड्यापासून तयार करण्यात आलेला हेअर मास्क लावू शकता. यासाठी अंड्यामध्ये एक चमचा बदामाचे तेल मिक्स करुन घ्या. दोन्ही सामग्री व्यवस्थितीत मिक्स केल्यानंतर हेअर मास्क केसांना अर्धा तास लावून ठेवा. यावेळी केस धुताना गरम पाण्याचा अजिबात वापर करू नका.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

आणखी वाचा : 

व्यायामाशिवाय पोटावरील चरबी होईल कमी, करा हे 5 उपाय

4 मिनिटांच्या व्यायामाने महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका होतो कमी

Share this article