वर्ष 2025 चे कॅलेंडर पाहून नागरिक हैराण, पण का? वाचा सविस्तर

| Published : Dec 03 2024, 10:12 AM IST / Updated: Dec 03 2024, 10:15 AM IST

2025 calendar
वर्ष 2025 चे कॅलेंडर पाहून नागरिक हैराण, पण का? वाचा सविस्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

वर्ष 2025 चा पहिला दिवस बुधवार पासून सुरू होणार आहे. यामुळे कॅलेंडरच्या पहिल्या तीन दिवसांची सुरुवात कामापासूनच होणार आहे. अशातच काहीजणांनी त्याला WTF असे म्हणण्यास सुरुवात केली आहे.

Shocking New Year Calendar : वर्ष 2024 मधील सध्या शेवटचा महिना सुरू आहे. वर्ष 2025 येण्यासाठी 28 दिवस शिल्लक राहिले आहेत. बहुतांशजण नव्या वर्षाच्या स्वागतासह त्यावेळी कोणत्या गोष्टींची सुरुवात करणार याचे प्लॅनिंग आतापासूनच करायला लागले आहेत. काहींनी तर एखादी मोठी ट्रिप किंवा आयुष्याची नवी सुरुवात करू असाही विचार केला असेल. अशातच वर्ष 2025 चे कॅलेंडर समोर आले असून नागरिक बुचकळ्यात पडले आहेत. कारण नव्या वर्षाची सुरुवात बुधवारपासून होत आहे. आता यामध्ये काय चुकीचे असा तुम्ही विचार करत असाल ना?

नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेबद्दल युजर्स हैराण

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वरील एका युजर्सने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीपासूनच्या पुढील तीन दिवसांना वेगळे नाव दिले आहे. युजर्सने 1 जानेवारी ते 3 जानेवारीमधील दिवसांना WTF असे म्हटले आहे. म्हणजेच Wednesday, Thursday आणि Friday.

युजर्सची प्रतिक्रिया

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वरील युजर @wtffrio याने वर्ष 2025 चे कॅलेंडर पाहून एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. याशिवाय बुधवार ते शुक्रवारमधील दिवस पाहून आपण चिंता व्यक्त करावी का असा प्रश्नही उपस्थितीत केला आहे. खरंतर, युजरने WTF अशा शब्दाने वर्षाची सुरुवात होणार असल्याचे दाखवून दिले आहे.

 

 

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर सध्या पोस्ट व्हायरल झाली असून 11 दशलक्ष वेळा पाहिली गेली आहे. यावर अन्य युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. काही युजर्सने म्हटले की, “येणाऱ्या वर्षाकडून अधिक अपेक्षा करत नाहीये.” दुसऱ्याने म्हटले, “प्रत्येक वर्ष गेलेल्या वर्षाप्रमाणे वाईटच असते.”तिसरा म्हणतो की, "आम्ही आधीच देशोधडीला लागलो आहोत."

कॅलेंडरमधील खास गोष्ट

एका युजरने म्हटले की, "वर्ष 2020 मध्ये देखील महिन्याच्या सुरुवातीचे तीन दिवस बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार होते. याच वर्षी कोविड-19 सारख्या महारोगाची लाट आली होती. यावर एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटले की, वर्ष 2020 मध्ये झालेल्या घटनेमुळे मला आता चिंता वाटू लागली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे कोविडमधील काळ कसा गेला आहे. "

 

 

आणखी वाचा : 

सुनिता विल्यम्स यांचे अंतराळातील शेती प्रयोग

फ्रेंच फ्राईजऐवजी चिकन बर्गर, २ लाख रुपये नुकसान भरपाईची मागणी