सार

पैसे कमविण्यासाठी लोक नवनवीन मार्ग शोधतात. ही महिला देखील एक विचित्र वस्तू विकून उत्पन्न वाढवत आहे. ही घृणास्पद वस्तू कोण खरेदी करत आहे हा प्रश्नच आहे. 
 

उत्पन्न (Income) वाढवण्यासाठी लोक वेगवेगळी कामे करतात. पूर्णवेळ नोकरीसोबत अर्धवेळ कमाई आता गरजेची झाली आहे. काहींची कमाई मात्र विचित्र असते. जास्त कष्ट न करता, घाणेरड्या वस्तू विकून पैसे कमवतात. यापूर्वी, वापरलेले मोजे, अंतर्वस्त्र विकून पैसे कमवणाऱ्या काही मुली व्हायरल झाल्या होत्या. आता एका तरुणीची विक्रीची वस्तू यापेक्षा वेगळी आहे. लोक हे देखील खरेदी करतील का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. ती नेमके काय विकून पैसे कमवते ते आम्ही सांगतो. 

तिचे नाव लतिशा जोन्स. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (social media influencer). टिक टॉक (TikTok) द्वारे प्रसिद्ध झालेली लतिशा जोन्सने जास्त उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. ती जी वस्तू विकते ती आपल्याला घृणास्पद वाटते. पण ती खरेदी करणारे लोक आहेत हेच विशेष.

कानमाती विकून लतिशा जोन्स दररोज किती पैसे कमवते : काही दिवसांपूर्वी लतिशा जोन्सने तिच्या अतिरिक्त उत्पन्नाबद्दल टिक टॉकवर एक व्हिडिओ (Video) शेअर केला होता. त्यानुसार, लतिशा जोन्स (Latisha Jones) तिची कानमाती विकते. हे काम घृणास्पद आणि विचित्र वाटत असले तरी यातून मला चांगली कमाई होते, असे लतिशा जोन्स म्हणाली आहे. ती कानमाती विकून शंभर, दोनशे रुपये कमवत नाही. दररोज ९ हजार रुपयांपर्यंत पैसे कमवते. 

लतिशा कशी विक्री करते? : लतिशाच्या मते, ती प्रथम कापूस कानबड्यांनी (Cotton Ear Buds) कानमाती (Ear Wax) काढते. नंतर एका कव्हरमध्ये ही कानमाती असलेली कानबडी ठेवून, सुंदरपणे कव्हर करते. नंतर ग्राहकांना हे पाठवते. याची किंमत कानमातीच्या आकारावर अवलंबून असते. कानमाती जास्त असेल तर ग्राहक जास्त पैसे देतात. अनेक ग्राहक कानमाती पैसे देऊन खरेदी करतात. हे विशेष आणि मनोरंजक आहे, असे लतिशा जोन्स म्हणाली आहे.

लतिशा जोन्सला मार्केटिंग युक्त्या माहित आहेत. घाणेरडी वस्तू ग्राहकांकडे आकर्षित करण्यासाठी आणि ग्राहक पुन्हा पुन्हा तिच्याकडे येण्यासाठी लतिशा एक युक्ती वापरते. कानमातीच्या पॅकिंगवर किस करून पाठवते. तिचा लिपस्टिकचा ठसा पॅकिंगवर असतो. 

जगात अशा विचित्र वस्तू विकून पैसे कमवणाऱ्यांची संख्या बरीच आहे. पण ते कोण खरेदी करते या प्रश्नाचे योग्य उत्तर नाही. अ‍ॅडल्ट अ‍ॅप्लिकेशनमध्ये अशा वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. लतिशा कुठे विक्री करते हे गुपित तिने सांगितले नाही.