US-Iran Tension : अमेरिकेचे अणुकरार नियम मान्य करण्यासाठी इराणला फक्त १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रम थांबवला नाही, तर वाईट परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

US-Iran Tension : अणुकरारावरची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक मोठा इशारा दिला आहे. अमेरिकेने ठेवलेल्या अणुकराराच्या अटी मान्य करण्यासाठी त्यांनी इराणला फक्त १० दिवसांची मुदत दिली आहे. युरेनियम समृद्धीकरण (Uranium Enrichment) पूर्णपणे थांबवावं आणि बॅलेस्टिक मिसाइल कार्यक्रम सोडून द्यावा, अन्यथा वाईट गोष्टी घडतील, अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. दुसरीकडे, पेंटागॉननेही इराणविरोधात लष्करी कारवाईसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

दरम्यान, ट्रम्प आपल्याला धमकी देत असल्याचं सांगत इराणने थेट संयुक्त राष्ट्राला (UN) पत्र लिहिलं आहे. या पत्रात इराणने म्हटलं आहे की, 'या भागात अमेरिकेची लष्करी ताकद वाढवणं म्हणजे आमच्यावर हल्ला करण्याची तयारी आहे. जर हल्ला झाला, तर या भागातील अमेरिकेच्या लष्करी तळांवर आणि सुविधांवर इराण पलटवार करेल.' त्यामुळे सुरक्षा परिषदेने (Security Council) यात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही इराणने केली आहे.