सार

तैवान संसदेत भांडण मोठ्या प्रमाणावर झाली असून यामुळे खासदारांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. येथे सरचिटणिसांकडून कागदपत्रे हिसकावून घेतल्यामुळे वाद वाढल्याचे सांगण्यात आले आहे. 

तैवानच्या संसदेचे अधिवेशन गाजले असून यामध्ये गोंधळ झाला. त्यामुळे तैवानच्या संसदेत सगळीकडे लोकांचा गोंधळ उडालेला होता. संसदेमध्ये विदेयकांच्या मालिकेवरून खासदारांमध्ये संघर्ष उडाल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून दिसून आले आहे. या व्हिडिओमध्ये संसदेतील आमदारांमध्ये धक्काबुकीपासून मारहाणीपर्यंत सर्वच सुरु होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

विधिमंडळाचे अधिकार वाढवण्यावरून झाले वाद - 
सत्ताधारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, विरोधी पक्ष कुओमिनतांग आणि तैवान पीपल्स पार्टी यांच्यातील चर्चा अयशस्वी झाल्यानंतर तणाव वाढत गेला. त्यानंतर हा वाद वाढत जाऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून तो अजून वाढत गेला आणि एकदम विकोपाला जाऊन पोहचला. यावेळी संसद भवनातील आमदार एकमेकांमध्ये भिडून भांडण करत असल्याचे दिसून आले. 

 

खासदारांनी मंचावर धक्काबुकीला झाली सुरुवात - 
अधिवेशन सुरु झाल्यानंतरच पक्षाच्या व्हिपमध्ये बाचाबाची झाली. परिस्थिती इतक्या मोठ्या प्रमाणावर तापली होती की अनेक खासदार व्यासपीठावर चढून एकमेकांमध्ये वाद करत होते. त्यांचे वाद वाढल्यामुळे अनेक आमदारांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे अनेक खासदारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे तैवान सरकारची मान खाली झुकली आहे. 

सरचिटणिसांकडून कागदपत्रे हिसकवल्यामुळे गोंधळात झाली वाढ - 
एका खासदाराने महासचिवांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेऊन संसदेच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये सुरुवातीला हाणामारी आणि नंतर त्याचे रूपांतर मोठया प्रमाणावर झाले. रात्री आठ वाजेपर्यंत पाच आमदारांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 
आणखी वाचा - 
'भाजप आता स्वयंपूर्ण आहे, आधी RSS ची गरज पडायची!', जे. पी. नड्डांचं मोठं वक्तव्य
कन्हैय्या कुमारवर हल्ला करणारी व्यक्ती आहे तरी कोण? हल्ल्यानंतर धडा शिकवल्याचे व्यक्त केले मत