उत्तर वजिरीस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात १३ पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून १२ हून अधिक महिला आणि लहान मुले जखमी झाली आहेत. सैन्याच्या वाहनाला कारने धडक दिल्याने हा स्फोट झाला.

पाकिस्तानमधील वातावरण सध्याच्या घडीला बिघडून गेलं आहे. उत्तर वजिरीस्तान या ठिकाणी आत्मघातकी हल्ला झाला असून त्यात १३ पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. मीर अली खादी मार्केटमध्ये झालेल्या हल्यात जखमींमध्ये १२ हुन अधिक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. यामधील जखमींची प्रकृती चिंताजनक आहे.

बॉम्बस्फोट कसा झाला? 

कारने धडक दिल्यामुळे सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पाकिस्तानी सैन्याच्या एका वाहनाला जोरदार धडक दिली आहे. बॉम्ब डिस्पोजल विभागाचे युनिटचे वाहन या ठिकाणी होते. सैन्याचे वाहन नागरी भागात ड्युटीवर जात असताना त्याच्यावर हल्ला केला आणि त्यामध्ये १३ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटामध्ये आजूबाजूच्या घरांचे नुकसान झाले आहे.

दहशतवादी हल्यांची संख्या वाढली 

हा स्फोट अतिशय भयानक असून २ घरांवरील छत कोसळले असून ६ जण जखमी झाले आहेत. जागतिक आकडेवारीनुसार पाकिस्तानात दहशतवादी हल्यात मृतांची संख्या ४५ टक्यांनी वाढली आहे. पाकिस्तानात मृत्युमुखी पडलेल्या दहशतवाद्यांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानातील वाढत्या दहशतवादी हल्ल्याबाबत सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.