सार
PM Modi Austria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाच्या एक दिवसीय दौऱ्यावर व्हिएन्ना येथे पोहोचले आहेत. व्हिएन्ना येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे वंदे मातरमने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली.
PM Modi Austria Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रियाच्या एक दिवसीय दौऱ्यावर व्हिएन्ना येथे पोहोचले आहेत. व्हिएन्ना येथील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे वंदे मातरमने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी अनिवासी भारतीयांचीही भेट घेतली. रशियाचा दौरा आटोपून युरोपीय देश ऑस्ट्रियाला पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे येथेही जल्लोषात स्वागत करण्यात आले. युरोपीय देशात पंतप्रधानांचे रेड कार्पेटने स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग स्वत: विमानतळावर पोहोचले.
पीएम मोदींसोबत सेल्फी केला पोस्ट
त्यानंतर चांसलर कार्ल नेहमर यांनी ऑस्ट्रियाला पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट करताना ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी, व्हिएन्नामध्ये स्वागत आहे. ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करणे ही आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे मित्र आणि भागीदार आहेत. मी तुमच्या भेटीदरम्यान आमच्या राजकीय आणि आर्थिक चर्चेसाठी उत्सुक आहे!'
पीएम मोदींसोबत पोस्ट केलेल्या पोस्टला सोशल मिडियावर मिळाला चांगला प्रतिसाद
ऑस्ट्रियाचे चांसलर कार्ल नेहॅमर यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट केलेल्या ट्विटला 3,100 रिट्विट्स मिळाले आहेत तर सुमारे 36,000 लाईक्स आणि 1.3 दशलक्ष अधिक व्ह्यूज मिळाले. पंतप्रधान मोदींना टॅग करत आणि ऑस्ट्रियामध्ये त्यांचे स्वागत करणारे त्यांचे अन्य ट्विट, सुमारे 2,600 रिट्विट्स, 23,000 लाईक्स आणि 2.5 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले.
या दोन्ही ट्विटला अभूतपूर्व पसंती मिळाली. त्याची तुलना त्याच्या नेहमीच्या ट्विट्सशी केल्यास, त्यांना सरासरी 100 पेक्षा कमी रिट्विट्स, 300 लाईक्स आणि जवळपास 25,000 व्ह्यूज आहेत. या दोन ट्विट आणि त्यांच्या इतर ट्विटमधला महत्त्वाचा फरक म्हणजे पीएम मोदींची उपस्थिती हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींना सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत असतो.
आणखी वाचा :