PM Modi Marvel Stadium Melbourne : पंतप्रधान मोदी मेलबर्नमध्ये भारतीयांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या तरुणीच्या कृत्याने मोदींनी मागे वळून पाहिलं. हा व्हिडिओ चर्चेत आला आहे. 

मेलबर्न : पंतप्रधान मोदी नुकतेच मेलबर्न दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान ते भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी झाले होते. तसंच मेलबर्न येथील माव्हर्ल स्टेडियमवर ते भारतीय समुदायाला संबोधित करणार होते. ज्यावेळी पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाला संबोधित करण्यासाठी स्टेडियमवर गेले, त्यावेळी एक वेगळंचच दृष्य पाहायला मिळालं. या दृष्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान मोदी मंचावर पोहोचले. त्यांनी मंचावर संबोधितही केलं. मात्र त्याचदरम्यान पंतप्रधान मोदींच्या मागे एक तरुणी उभी होते, तिच्या कृत्याने सर्वांचच लक्ष वेधलं. मुलगी हातात कॅमेरा घेऊन उभी होती. पंतप्रधान मोदींच्या मागे उभी राहून ती सतत काही इशारे समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला करत होती. तिच्या सततच्या इशाऱ्यांनी, सतत सुरू असलेल्या हातवाऱ्यांमुळे पंतप्रधान मोदींनी मागे वळून पाहिलं. मोदींनी तिच्याकडे पाहताच तिने लगेच त्यांचा फोटो क्लिक केला.

हातात कॅमेरा असलेला तरुणी, तिच्या इशाऱ्यांमुळे मागे वळून पाहणारे पंतप्रधान मोदी यांचा हा अगदी काही सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान मंचावरुन नागरिकांना संबोधित करत असतानाचा घडलेली ही घटना, भाषणातील काहीसा भाग आहे. या महिलेला पंतप्रधानांसोबत फोटो काढायचा होता. त्यासाठीच ती इशारे, हातवारे करत समोरील व्यक्तीला तिचा पंतप्रधान मोदींसह फोटो काढायला सांगत होती. त्याचवेळी मोदींनी मागे वळून पाहिलं.

Scroll to load tweet…

महत्त्वाचं म्हणजे ऑस्ट्रोलियामध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांच्या मोठ्या समुदायाला संबोधित करताना ही घटना घडली. या कार्यक्रमासाठी तब्बल ३० हजारहून अधिक भारतीय उपस्थित होते. या घटनेमुळे तिथे मंचावर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज उपस्थित होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी ८ ते १० जुलै ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. मोदी मंचावर पोहोचताच तिथे स्टेडियममध्ये मोद-मोदी अशा घोषणा लोक देत होते. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी याबाबत बोलताना सांगितलं, 'आतापर्यत मार्वल स्टेडियममध्ये अनेक कार्यक्रम झाले. मात्र असं आयोजन कधीही पाहिलं नव्हतं. स्टेडियममध्ये दिसणारा हा उत्साह भारत आणि ऑस्ट्रेलियाची चांगली भागीदारीचं दर्शवतं', असं ते म्हणाले.