PM Modi : पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर पोलीस, तसंच इतर यंत्रणांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते मेलबर्न इथे 'मेलबर्न मीट्स मोदी' या कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. मात्र या दौऱ्याआधी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. फेसबुक पोस्टवरील कमेंटमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या कमेंटनंतर ऑस्ट्रेलिया पोलीस, तसंच सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेत तात्काळ तपास सुरू केला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी जीवे मारण्याची धमकी

ऑस्ट्रेलियातील मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा येत्या ९ जुलै रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न इथे दौरा आहे. ९ जुलै रोजी मेलबर्नमधील 'मार्व्हल स्टेडियम'वर 'मेलबर्न मीट्स मोदी' हा कार्यक्रम होणार आहे. मेलबर्न मीट्स मोदी' या कार्यक्रमाशी संबंधीत एक फेसबुक पोस्ट शेअर करण्यात आली होती. त्याच फेसबुक पोस्टखाली मोदींना धमकी देण्यात आली.

पोलिसांकडून तत्काळ तपास सुरू

'कार्यक्रमावेळी स्टेडियमचं छत बंद ठेवा, नाहीतर मोदी ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या मृत्यूला आमंत्रण देतील' अशा आशयाची कमेंट फेसबुक पोस्टखाली करण्यात आली होती. या घटनेची ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या कमेंट करणाऱ्याचा आयपी अॅड्रेस मिळाला असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत अद्याप ऑस्ट्रेलियन फेडरल पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाल्याची माहिती नाही.

पंतप्रधान मोदींचा ऑस्ट्रेलिया दौरा

पंतप्रधान मोदी ८ जुलैपासून ते १० जुलैपर्यंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी ते भारत-ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते द्विपक्षीय चर्चा तसंच मेलबर्नमधील सामुदायिक कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत.