- Home
- World
- North Korea Jeans Ban : जीन्स घातली तर थेट जेल! 'या' देशात असा विचित्र नियम का आहे माहितीये?
North Korea Jeans Ban : जीन्स घातली तर थेट जेल! 'या' देशात असा विचित्र नियम का आहे माहितीये?
या देशात जीन्स घातली की थेट जेलची हवा खावी लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणालाच इथे जीन्स घालण्याची परवानगी नाही. हा देश जीन्सला परदेशी कपडा मानतो. असा विचित्र नियम नक्की कोणत्या देशात आहे?

उत्तर कोरियात जीन्सवर बंदी
जीन्स हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता कपडा आहे. कमी पैशात जास्त काळ टिकणारा हा कपडा जगभरात लोकप्रिय आहे. पण उत्तर कोरियात मात्र यावर कडक बंदी आहे. तिथे निळ्या रंगाच्या जीन्सला पाश्चात्य संस्कृती आणि अमेरिकन जीवनशैलीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळेच तिथल्या सरकारने या कपड्यांवर बंदी घातली आहे. जगभरात फॅशन मानली जाणारी जीन्स उत्तर कोरियात मात्र राजकीय आणि सामाजिक नियंत्रणाचा भाग बनली आहे. तिथे तुम्हाला एकही व्यक्ती जीन्स घातलेली दिसणार नाही.

अमेरिकन संस्कृतीला विरोध
आपल्या देशातील नागरिकांवर परदेशी संस्कृतीचा प्रभाव पडू नये, यासाठी उत्तर कोरियाचे सरकार अनेक निर्बंध लादते. त्यांना अमेरिकन संस्कृती अजिबात आवडत नाही. जीन्सलाही ते याच नजरेतून पाहतात. परदेशी अक्षरे असलेले टी-शर्ट, काही विशिष्ट फॅशनचे कपडे आणि हेअरस्टाईलवरही तिथे बंदी आहे. इतर देशांमध्ये कपडे निवडण्याचं स्वातंत्र्य असतं, पण उत्तर कोरियात तसं नाही. तिथे लोकांना सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच राहावं लागतं.
नियम मोडल्यास काय होते?
हे नियम मोडले तर काय होतं माहितीये? सुरुवातीला अधिकारी चौकशी करतात आणि ताकीद देतात. तरीही ऐकलं नाही तर कडक शिक्षा दिली जाते. निळ्या रंगाची जीन्स घातल्यास थेट जेलमध्ये जाण्याची शक्यता खूप जास्त असते. परदेशी संस्कृतीचा प्रभाव रोखण्यासाठी उत्तर कोरियात असे कडक नियम लागू केले आहेत. जगभरात जीन्स हा एक सामान्य कपडा आहे, पण उत्तर कोरियात मात्र हा एक मोठा वादाचा विषय आहे.








