इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सबसिडी आणि इलेक्ट्रिक वाहनांवरून वाद सुरू आहे. ट्रम्प यांनी मस्क यांना अमेरिकेबाहेर काढण्याची धमकी दिली असून, मस्क यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर टीका केली आहे.
काही दिवसांपासून इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात भांडण होत असल्याचं दिसून आलं आहे. दोघांचेही भांडण टोकाला गेले असून ट्रम्प यांनी मस्क यांना अमेरिकेबाहेर काढण्याची धमकी दिली आहे. डोनाल्ड यांनी बोलताना म्हटलं आहे की, जर मस्क यांची सबसिडी थांबली तर त्यांना त्यांची दुकान (कंपनी) बंद करावी लागेल आणि गाशा गुंडाळून दक्षिण आफ्रिकेत परतावे लागेल. सबसिडी थांबविल्यामुळे टेस्ला इलेक्ट्रिक कारचे उत्पादन करू शकणार नाही, ना स्पेसएक्सचे रॉकेट, उपग्रह प्रक्षेपित केले जातील.
मस्क यांना सरकारी सबसिडी म्हणून इतके पैसे मिळाले -
डोनाल्ड यांनी मस्क यांना सरकारी सबसिडीतून सर्वांपेक्षा जास्त पैसे दिल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी चौकशी केल्यास सरकारचे पैसे वाचतील असंही पुढं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. अध्यक्षपदासाठी पाठिंबा देण्याआधीच मला माहित होते की मी EV आदेशाच्या विरोधात आहे. इलेक्ट्रिक वाहने चांगली आहेत, परंतु सर्वांना ती खरेदी करण्यास भाग पाडणे चुकीचे आहे, असंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
सर्व सबसिडी आताच बंद करून टाका -
मला माहित नाही, आपल्याला त्याचा विचार करावा लागेल.ट्रम्प यांनी विनोद केला की DoGE हा मस्कला गिळंकृत करणारा राक्षस असू शकतो. त्यावर मस्क भडकून म्हणाले की, मी म्हणतोय, सर्व सबसिडी आत्ताच बंद करा. दोघांमधील हे शाब्दिक युद्ध टोकाला जाऊन पोहचल आहे. एक्स या प्लॅटफॉर्मवर मस्क यांनी त्यांचं मत मांडले आहे.
हे विधेयक लाखो नोकऱ्या संपवून टाकेल
'ट्रम्प यांचे हे विधेयक अमेरिकेतील लाखो नोकऱ्या संपवेल आणि आपल्या देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान करेल.' मस्क पुढे म्हणाले, 'हे पूर्णपणे वेडे आणि विनाशकारी आहे. हा कायदा जुन्या उद्योगांना सवलती देतो, परंतु भविष्यातील उद्योगांना नष्ट करेल.' बिग ब्युटीफुल विधेयकावरून दोघांमधील वाद हा वाढतच चालला आहे.
एका बाजूला ट्रम्प यांनी या विधेयकाला पाठींबा दिला असून दुसऱ्या बाजूला मात्र मस्क यांनी त्याला विरोध केला आहे. जर मी तिथे नसतो तर ट्रम्प निवडणूक हरले असते. त्यांनी ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याबद्दलही मस्क यांनी आरोप केला आहे.