जपानच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्सुनामीचा इशारा दिला. किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

Earthquake in Japan: जपानच्या उत्तर किनाऱ्यावर रविवारी 7.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्सुनामीचा इशारा दिला. किनारपट्टी भागातील लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. तर, मॉनिटरिंग एजन्सी संभाव्य लाटांची उंची आणि नुकसानीचा अंदाज घेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, जपानच्या हवामान एजन्सीच्या सुरुवातीच्या अहवालात सोमवारी झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 असल्याचे म्हटले आहे. हा भूकंप आओमोरी आणि होक्काइडो किनाऱ्याजवळ झाल्याचे एजन्सीने सांगितले.

10 फूट उंच लाटा उसळण्याची शक्यता

जपानच्या हवामान एजन्सीनुसार, ईशान्य किनाऱ्यावर सुमारे 3 मीटर (10 फूट) उंच लाटा उसळू शकतात आणि त्सुनामी येऊ शकते.