सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या संवादाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात दोन्ही नेते एकमेकांची विचारपूस करताना, हस्तांदोलन करताना आणि मैत्रीपूर्ण हास्यविनोद करताना दिसत आहेत.

कॅनडातील कानानास्किस येथे पार पडलेल्या G7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची दिलखुलास भेट झाली. या भेटीत मेलोनी यांनी मोदींना उद्देशून म्हटले, "You are the best, I am trying to be like you" (तुम्ही सर्वोत्तम आहात, मी तुमच्यासारखी होण्याचा प्रयत्न करते आहे).

सोशल मीडियावर सध्या या दोघांच्या संवादाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात दोन्ही नेते एकमेकांची विचारपूस करताना, हस्तांदोलन करताना आणि मैत्रीपूर्ण हास्यविनोद करताना दिसत आहेत.

मेलोनीच्या या शब्दांना उत्तर म्हणून पंतप्रधान मोदी हसले आणि अंगठा दाखवत थंब्स अप करून कौतुक स्वीकारले.

मोदींचं ट्विट : “भारत-इटली मैत्री अधिक दृढ होईल”

या भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की,

"India’s friendship with Italy will continue to get stronger, greatly benefitting our people!"

(भारत आणि इटली यांच्यातील मैत्री अधिक दृढ होईल आणि आपल्या दोन्ही देशांच्या नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.)

#Melodi ट्रेंड पुन्हा चर्चेत

ही भेट त्यांच्या पूर्वीच्या अनेक मैत्रीपूर्ण भेटींच्या मालिकेतील आणखी एक लक्षवेधी क्षण ठरला आहे. यापूर्वी दुबईमध्ये झालेल्या COP28 परिषदेदरम्यान मेलोनी यांनी मोदींसोबत सेल्फी शेअर केली होती आणि त्याला "Good friends at COP28, #Melodi" असे कॅप्शन दिले होते. त्यावेळीही हा हॅशटॅग प्रचंड गाजला होता. आता पुन्हा एकदा #Melodi ट्रेंड चर्चेत आला आहे.

Scroll to load tweet…

भारत-इटली सहकार्य : ऊर्जा, उद्योग आणि शाश्वततेवर भर

या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीपूर्ण संवादातून भारत आणि इटली यांच्यातील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होत असल्याचे स्पष्ट दिसते. दोन्ही देश शाश्वत ऊर्जा, औद्योगिक सहकार्य आणि नवकल्पनांवर एकत्र काम करण्याबाबत उत्साही आहेत.

G7 परिषदेमधील भारताचे स्थान ठाम : मार्क कार्नी यांचं मत

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनीही पंतप्रधान मोदींच्या G7 परिषदेमधील उपस्थितीचं कौतुक केलं. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं :

“पंतप्रधान मोदी G7 परिषदेचे 2018 पासून सातत्याने सहभागी होत आहेत. हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा आणि नेतृत्वक्षमतेचा प्रतीक आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राचा वेग, G20 मधील भुमिका हे सर्व पाहता G7 मध्ये त्यांची उपस्थिती पूर्णतः स्वाभाविक आणि गरजेची आहे.”

कार्नी पुढे म्हणाले की, “मला खात्री आहे की पंतप्रधान मोदी पुढील वर्षीही G7 परिषदेत सहभागी होतील.”

मैत्रीच्या भाषेत जागतिक सहकार्य

जगाच्या राजकारणात सध्या अनेक अस्थिरतेचे वारे वाहत असताना, मोदी आणि मेलोनी यांचा हसतमुख संवाद जागतिक नेत्यांमधील मैत्रीचा आणि सहकार्याचा संदेश देणारा ठरला आहे. "You are the best" हे मेलोनींचं विधान केवळ व्यक्तिगत कौतुक नाही, तर भारताच्या जागतिक भुमिकेचा सन्मान आहे.

गुडघ्यावर बसून मेलोनी यांचे एदी रामांनी केले होते स्वागत

युरोपियन नेत्या जॉर्जिया मेलोनी यांचे अल्बेनियामध्ये झालेल्या European Political Community (EPC) शिखर परिषदेसाठी आगमन झाले आणि त्यावेळी अल्बेनियाचे पंतप्रधान एदी रामांनी त्यांच्या स्वागतासाठी दिलेला अद्वितीय आणि आदरयुक्त प्रतिसाद सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसत होतं की पावसाच्या सरी सुरू असताना, लाल गालिच्याच्या एका बाजूला एदी रामांनी हातात छत्री धरलेली आहे. मेलोनी जवळ येताच ते अत्यंत आदबीनं एका गुडघ्यावर बसतात, छत्री खाली ठेवतात आणि हात जोडून त्यांचं स्वागत करतात. नंतर ते उभे राहून मेलोनी यांना मिठी मारतात आणि मोठं स्मित करत त्यांचं हार्दिक स्वागत करतात.