Iran President helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री बेपत्ता

| Published : May 20 2024, 08:15 AM IST / Updated: May 20 2024, 01:38 PM IST

Ebrahim Raisi
Iran President helicopter crash : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्री बेपत्ता
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॅप्टरला अपघात झाला आहे. हा अपघात धुक्यामुळे झाला असून वातावरणामुळे येथे पोहचण्यास बचाव पथकाला अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. 

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी आणि त्यांचे मंत्री घेऊन जाणाऱ्या हेलिकॅप्टरला अपघात झाला आहे. रविवारी हेलिकॅप्टर अपघात झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांशी संपर्क होऊ शकलेला नाही. अजरबैजानहून इराणला येत असताना हा अपघात झाला आहे. हा अपघात अझरबैजानच्या सीमेवरील इराणच्या जोल्फा शहरात झाला. 

अपघाताचे कारण दाट धुके - 
या अपघाताचे कारण दाट धुके असल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्यामुळे अपघात झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. डोंगराळ भाग पार करत असताना धुके आल्यामुळे अपघात झाल्याचे सांगितले आहे. खराब हवामान असल्यामुळे मदतकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. आम्ही सर्व आशावादी असून तिथून येणारी माहिती मात्र चिंताजनक असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. राष्ट्रपतींना घेऊन जाणारे हेलिकॅप्टर बचाव पथकाने शोधून काढल्याचा दावा केला जात आहे, पण अजून त्याला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. टीव्हीवरही या ठिकाणी चालवल्या जाणाऱ्या बचाव मोहिमेची लाईव्ह माहिती देण्यात आली आहे. 

तीन हेलिकॅप्टरपैकी राष्ट्रपतींच्या हेलिकॅप्टरला झाला अपघात - 
राष्ट्रपतींच्या ताफ्यामध्ये तीन हेलिकॅप्टर होते पण त्यापैकी त्यांच्याच हेलिकॅप्टरला अपघात झाल्याची माहिती समजली आहे. मंत्री आणि अधिकारी दोन हेलिकॉप्टरमध्ये होते. अध्यक्ष इब्राहिम रायसी स्वतः तिसऱ्या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांच्यासोबत तबरीझचे शुक्रवारचे प्रार्थनेचे इमाम, सय्यद मोहम्मद-अली अल-हाशेम आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीरबदुल्लाहियान होते. बाकी दोन हेलिकॅप्टर हे तेहरानला पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ट्विट - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राष्ट्राध्यक्षांसाठी प्रार्थना केली आहे. त्यांनी आम्ही इराणी लोकांसोबत असून राष्ट्रपती लवकरच परततील अशी आशा व्यक्त केली आहे. इब्राहिम रायसी यांची २०२१ मध्ये अध्यक्षपदी निवड झाली होती. इराणचे सर्वोच्च नेते म्हणूनही या राष्ट्रपतींकडे पाहिले जात होते. 
आणखी वाचा - 
लोकसभेचे सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट'
'पंतप्रधान नरेंद्र मोदी आम आदमी पार्टीला नष्ट करण्याच्या मिशनवर', अरविंद केजरीवाल यांनी केली टीका