MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • World
  • Pakistan Economy : अमेरिका-इराणच्या युद्धामुळे पाकिस्तानचे निघाले दिवाळे, आतापर्यंत झाले ऐवढे नुकसान

Pakistan Economy : अमेरिका-इराणच्या युद्धामुळे पाकिस्तानचे निघाले दिवाळे, आतापर्यंत झाले ऐवढे नुकसान

एकेकाळी युद्धांमधून अब्जावधी डॉलर्स कमावणारा पाकिस्तान आता अमेरिका-इराण संघर्षामुळे कंगाल झालाय. ज्या भौगोलिक स्थानामुळे पाकिस्तानला नेहमीच फायदा व्हायचा, तेच आता त्याच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरलं आहे. वाचा सविस्तर.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 20 2026, 12:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पाकिस्तानने नेहमीच युद्धांमधून पैसा कमावला
Image Credit : X

पाकिस्तानने नेहमीच युद्धांमधून पैसा कमावला

पाकिस्तानने नेहमीच युद्धांमधून पैसा कमावला आहे. १९७९ मध्ये सोव्हिएत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला, तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्स दिले. एकट्या १९८० च्या दशकात पाकिस्तानमध्ये २० ते २७ अब्ज डॉलर्सची परकीय मदत आली. २००१ च्या 9/11 हल्ल्यानंतरही अमेरिकेने पाकिस्तानला १३ अब्ज डॉलर्सहून अधिक लष्करी आणि आर्थिक मदत दिली. यामुळे पाकिस्तानचा परकीय चलन साठा प्रचंड वाढला होता.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
पाकिस्तानला फायद्याऐवजी नुकसान
Image Credit : X

पाकिस्तानला फायद्याऐवजी नुकसान

पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे पाकिस्तानला फायद्याऐवजी मोठं नुकसान सोसावं लागतंय. त्याच्या परकीय चलन साठ्याला मोठी गळती लागली आहे. यावर्षी पाकिस्तानमधून ५.७ अब्ज डॉलर्स बाहेर गेले आहेत, तर त्याचा एकूण राखीव साठा फक्त १६ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) तर पाकिस्तानला एप्रिलच्या अखेरपर्यंत त्यांचे ३.५ अब्ज डॉलर्स परत करण्यास स्पष्टपणे सांगितलं आहे.

Related Articles

Related image1
Iran U-Turn : इराण अचानक चर्चेतून का फिरलं? ट्रम्प यांच्या एका धमकीने सगळा गेम कसा पलटला, जाणून घ्या
Related image2
Spy Satellite : चीनच्या सॅटेलाईटमुळे इराणची अमेरिकेवर नजर? मोठा खुलासा!
35
पाकिस्तानला मदतीचा हात
Image Credit : X

पाकिस्तानला मदतीचा हात

पाकिस्तानला पूर्णपणे बुडण्यापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबिया आणि कतारने ५ अब्ज डॉलर्सच्या मदतीचं आश्वासन दिलं आहे. ही मदत त्याच्यासाठी उपयोगी ठरू शकते, पण हा 'ऑक्सिजन' किती काळ टिकेल, हे कोणालाच माहीत नाही.
45
पाकिस्तानची अर्थव्यवस्था
Image Credit : X

पाकिस्तानची अर्थव्यवस्था

पाकिस्तानची अर्थव्यवस्था थेट होर्मुझच्या सामुद्रधुनीवर (Strait of Hormuz) अवलंबून आहे. पाकिस्तान आपल्या गरजेच्या ८०-८५% तेल आणि गॅस याच मार्गाने आयात करतो. इराण-अमेरिका तणावामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तानचं आयातीचं बिल (Import Bill) गगनाला भिडलं आहे. पाकिस्तानने अमेरिका आणि इराणमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची पहिली फेरी अयशस्वी ठरली. दुसरी फेरी तर सुरू होण्याआधीच बारगळण्याची चिन्हं आहेत, कारण इराणने यात कोणताही रस दाखवलेला नाही.
55
पाकिस्तानची अशी होऊ शकते स्थिती
Image Credit : X

पाकिस्तानची अशी होऊ शकते स्थिती

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा पाकिस्तानकडे तेल आयात करण्यासाठी पैसे उरणार नाहीत आणि परदेशी कर्जाचा बोजा वाढेल, तेव्हा त्याचा थेट परिणाम तिथल्या सामान्य जनतेवर होईल. तिथे पेट्रोलच्या किमतींनी आधीच उच्चांक गाठला आहे आणि आता वीज-गॅसचं संकटही अधिक गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी वाढू शकतात.
World News (जागतिक घडामोडी): Read Latest World News,International News Today, वर्ल्ड ब्रेकिंग न्यूज, वर्ल्ड न्यूज टुडे हेडलाईन्स & International News LIVE Updates in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जागतिक बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Europe Supermarket Hacking : युरोपमधील सुपरमार्केटचे फ्रीज कोण हॅक करतंय?
Recommended image2
Indian Navy Rescue : भारतीय नौदलाची कमाल! २० नागरिकांची केली सुटका, इराणने मानले आभार
Recommended image3
Disney Layoffs : डिझ्नीमध्ये पुन्हा नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांवर गदा
Recommended image4
Nepal Helicopter Crash : नेपाळमध्ये लँडिंग करताना दोन हेलिकॉप्टरची धडक, थरारक व्हिडिओ व्हायरल
Recommended image5
Viral Video: डेल्टा एअरलाइन्सच्या पायलटची भन्नाट अनाउन्समेंट, व्हिडिओ व्हायरल
Related Stories
Recommended image1
Iran U-Turn : इराण अचानक चर्चेतून का फिरलं? ट्रम्प यांच्या एका धमकीने सगळा गेम कसा पलटला, जाणून घ्या
Recommended image2
Spy Satellite : चीनच्या सॅटेलाईटमुळे इराणची अमेरिकेवर नजर? मोठा खुलासा!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved