नेपाळच्या एव्हरेस्ट भागात लँडिंग करताना 'फिशटेल एअर' आणि 'एअर डायनेस्टी'च्या दोन हेलिकॉप्टरची हवेतच धडक झाली. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.
मुंबई : नेपाळमध्ये एका उंचावरील हेलिपॅडवर लँडिंग करत असताना दोन हेलिकॉप्टरची एकमेकांना धडक बसली. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी 'एक्स' (X) वर दिली आहे.
राजधानी काठमांडूपासून २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या सोलुखुंबू येथील हेलिपोर्टवर हा अपघात झाला. या घटनेचा एक थरारक व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पाहा व्हायरल व्हिडिओ
Scroll to load tweet…





