Iran US Deal : इराणने अमेरिकेसोबत झालेल्या कराराचे पालन न केल्यास आवश्यक ती कारवाई करण्याचा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

Iran US Deal : अमेरिका आणि इराण यांच्यात नुकत्याच अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. पण दोन्ही दोघांमधील ताण अद्याप कमी झालेला नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रम्प यांनी म्हटले की, कराराचे पालन न केल्यास इराणच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ. यासाठी अमेरिकेकडून आवश्यक ती पावले उचलली जातील. ट्रम्प यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा मध्य पूर्वेतील भू-राजकीय घडामोडींना वेग येऊ शकतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

कराराचे पालन झाले नाही तर...

इराण-अमेरिका कराराच्या भवितव्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प यांनी म्हटले की, "इराणने कराराचे पालन न केल्यास मला जे करणे आवश्यक वाटते ते करेन". काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी अंतरिम व्यापार करारावर स्वाक्षरी केली होती.

इराणची लष्करी ताकद संपुष्टात?

इराण आता अमेरिकेवर दबाव निर्माण करू शकतो का, असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारला गेला. यावर ट्रम्प यांनी इराणची लष्करी क्षमता जवळपास संपल्याचा दावा केला. याशिवाय इराणचे नौदल आणि हवाई दल संपुष्टात आलेय. देशातील प्रमुख नेत्यांचाही मृत्यू झालाय. अर्थव्यवस्थाही पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचे विधान ट्रम्प यांनी केले.

क्षेपणस्र, ड्रोन आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त

गेल्या चार महिन्यांत इराणला मोठे नुकसान सहन करावे लागल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. ट्रम्प म्हणाले, इराणकडे असणाऱ्या अनेक युद्धनौका, विमाने, रडार यंत्रणेसह बहुतांश क्षेपणस्र साठा नष्ट झालाय. ड्रोन आणि क्षेपणास्त्र उत्पादन क्षमतेपैकी सुमारे 87 टक्के क्षमता उद्ध्वस्त झाल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले.

माध्यमांवरही ट्रम्प यांचा निशाणा

अमेरिकेतील काही वृत्तसंस्था इराणची परिस्थिती पूर्वीसारखी असल्याचा आभास निर्माण करतायत. याशिवाय माझ्याविरोधात 92 टक्के नकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या, पण आता जनतेचा माध्यमांवरील विश्वास कमी झाला आहे असेही ट्रम्प यांनी म्हटले.