Donald Trump : यावर्षीच्या शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी आपल्यासाठीच हा पुरस्कार स्वीकारल्याचे सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. आपण सात युद्धे संपवली असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Donald Trump : यावर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार न मिळाल्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुरस्कार विजेत्या, व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना अनेकवेळा मदत केली आहे. माझ्या सन्मानार्थ आणि मी यास पात्र असल्यामुळेच शांततेचा नोबेल स्वीकारत असल्याचे मारिया कोरिना मचाडो यांनी मला फोन करून सांगितल्याचा दावा ट्रम्प यांनी केला.

व्हेनेझुएलामध्ये मारिया कोरिना मचाडो यांना आपण बऱ्याच काळापासून मदत करत असल्याचे ट्रम्प म्हणाले. त्यांना व्हेनेझुएलामध्ये खूप मदतीची गरज आहे. लाखो लोकांचे प्राण वाचवल्याचा मला आनंद आहे, असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसला भेट दिलेल्या पत्रकारांना सांगितले.

यावर्षीच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा नुकतीच झाली. व्हेनेझुएलातील लोकशाही हक्कांसाठीच्या लढ्याबद्दल मारिया कोरिना मचाडो यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे.

Scroll to load tweet…

'मी सात युद्धे संपवली. प्रत्येकासाठी मला नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता. पण ते म्हणाले की, जर रशिया-युक्रेन युद्ध संपवले असते, तर मला नोबेल पुरस्कार मिळाला असता. मी त्यांना सात युद्धे संपवल्याचे सांगितले. पण ते एक युद्ध मोठे आहे,' असे ट्रम्प पुढे म्हणाले. अर्मेनिया-अझरबैजान, कोसोवो-सर्बिया, इस्रायल-इराण, इजिप्त-इथिओपिया, रवांडा-काँगो ही युद्धे संपवणे हे आपले यश असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.