रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये डिलिव्हरी रोबोट्सच्या एका ग्रुपमुळे रस्त्यावर ट्रॅफिक जॅम झालं. हे रोबोट्स रस्ता ओलांडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहरात डिलिव्हरी रोबोट्सच्या एका ग्रुपमुळे रस्त्यावर थोडा वेळ ट्रॅफिक जॅम झालं. सुटकेसच्या आकाराचे हे रोबोट्स एकाच वेळी पादचारी मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सहा चाकांचे हे रोबोट्स माणसांसोबत हळूहळू रस्ता ओलांडताना दिसत आहेत.

हे रोबोट्स त्यांच्या सिस्टीममध्ये सेट केलेल्या सुरक्षेच्या नियमांचे पालन करत अगदी सावधपणे पुढे जात होते. त्यांचा हा संथ वेग पाहून गाड्या चालवणाऱ्यांनी आपली वाहने थांबवली आणि या संपूर्ण ग्रुपला सुरक्षितपणे रस्ता ओलांडू दिला.

एवढे छोटे रोबोट्स एकत्र रस्ता ओलांडताना पाहून नेटकऱ्यांनाही मज्जा आली. अनेकांनी या रोबोट्सची तुलना शाळेच्या सहलीला जाणाऱ्या लहान मुलांशी केली, जे एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडतात.

Scroll to load tweet…

या घटनेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, आता शहरांमध्ये डिलिव्हरी रोबोट्स दिसणं खूप सामान्य झालं आहे. पण कधी कधी त्यांच्यामुळे रस्त्यावर असे अनपेक्षित प्रसंगही पाहायला मिळतात.

डिलिव्हरी रोबोट्सचा वापर वाढला

गेल्या काही वर्षांत जगातील अनेक भागांमध्ये ऑटोमेटेड फूड आणि पॅकेज डिलिव्हरीचं प्रमाण वेगाने वाढलं आहे. त्यामुळे आता रस्त्यांवर माणसांच्या आणि गाड्यांच्या बरोबरीने रोबोट्सही फिरताना दिसत आहेत.

या महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय महिलेनेही असाच एक अनुभव शेअर केला होता. तिच्या आई-वडिलांनी पहिल्यांदाच रस्त्यावर फूड डिलिव्हरी रोबोट पाहिला होता.

प्रियांका नावाच्या या महिलेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत या क्षणाला 'अॅब्सोल्युट कोअर मेमरी' म्हटलं होतं. तिने सांगितलं की, ही घटना न्यू जर्सीमधील जर्सी सिटीतल्या इंडिया स्क्वेअरमध्ये घडली. आपल्या आई-वडिलांना पहिल्यांदाच हे आधुनिक तंत्रज्ञान पाहतानाचा आनंद 'खरोखरच अमूल्य' असल्याचं ती म्हणाली.

"मम्मी आणि पप्पांना रस्त्यावरून जाणारा फूड डिलिव्हरी रोबोट पाहतानाचा अनुभव माझ्यासाठी कायम लक्षात राहणारा होता!" असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं होतं.