कुत्र्यांसाठी चक्क विमानसेवा....मनुष्यांप्रमाणे करणार प्रवास, जाणून घ्या खासियत

| Published : May 25 2024, 05:29 PM IST / Updated: May 25 2024, 05:55 PM IST

ban dogs

सार

कंपनी BARK द्वारे लाँच करण्यात आलेली विमानसेवा व्यक्तींसाठी नव्हे खास कुत्र्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. खासियत अशी की, कुत्र्यांसाठी आलिशान विमानसेवा असणार आहे.

Flights for Dogs : जगात अनोख्या गोष्टी आहेत ज्यावर आपण विश्वासही ठेवू शकत नाही. पण दुसरी बाजू अशी देखील आहे, जेथे नागरिकांना आयुष्य जगण्यासाठी पुरेशा सुख-सुविधा उपलब्ध नाहीत. अशातच चक्क कुत्र्यांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. खरंतर, BARK Air नावाने कुत्र्यांसाठी विमानसेवा सुरू केली आहे.

बार्क द्वारे लाँच करण्यात आलेली विमानसेवा कुत्र्यांच्या मालकांसह सर्व आकारातील कुत्र्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यासंदर्भात कंपनीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. बार्क एअरलाइनने गुरुवारी 23 मे ला आपले पहिले उड्डाण न्यूयॉर्क येथून लॉस एंजिल्ससाठी केले. यावेळी कुत्र्यांच्या प्रवासाचा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 30 हजार फूट उंचीवरून कुत्र्यांचा विमान प्रवास.

आजवर अनेक विमानसेवांनी कुत्र्यांना विमानातून प्रवास करण्यास बंदी घातली आहे. पण बार्क एअरलाइनने यावरच तोडगा कढला आहे. खरंतर, कुत्रे आपल्या महत्त्वाच्या जबाबदारींपैकी एक आहेत. येथे कुत्र्यांना सर्वोच्च प्राथमिकता दिली जाते. याशिवाय विमानातील कर्मचारी कुत्र्यांसोबत आपलेपणाची भावना ठेवून वागतात.

कंपनीने पुढे म्हटले की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून कुत्र्यांसाठी एक वेगळी विमानसेवा सुरू करण्याचा विचार करत होतो. अशातच एका दशकानंतर आमचा विचार सत्यात उतरला आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सर्व कुत्र्यांना विमानसेवेचा अनुभव देऊ शकतो.

View post on Instagram
 

पशू प्रेमींनी दिल्या अशा प्रतिक्रिया
बार्क कंपनीच्या इंस्टाग्राम पोस्टखाली युजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका युजरने म्हटले की, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. याशिवाय माझ्या कुत्र्याला आता कार्गोमधून पाठवावे लागणार नाही अशीही प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा :

न्यूज कॉर्प पब्लिकेशन्स आणि ओपनएआयचा करार: वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क पोस्टचा मिळणार OpenAI ला एक्सेस

Video: आईने जेवणाच्या डब्यात मुलासाठी ठेवली लव्ह नोट, ज्याने मुलाच्या लव्हस्टोरीत आला ट्विस्ट ऐकून हसू आवरणार नाही…