WhatsApp सारखेच Arattai App आले मार्केटमध्ये, प्ले स्टोअरवर पोहचले क्रमांक एकवर
Arattai App: Arattai नावाचे एक नवीन मेसेजिंग ॲप बाजारात आले आहे, जे WhatsApp चा प्रतिस्पर्धी मानले जात आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर लोकप्रिय झाले असून यात व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग, ग्रुप चॅट आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सारखे अनेक फीचर्स आहेत.

WhatsApp सारखेच Arattai App आले मार्केटमध्ये, प्ले स्टोअरवर पोहचले क्रमांक एकवर
WhatsApp चा प्रतिस्पर्धी म्हणून Arattai नावाचे अँप मार्केटमध्ये आलं आहे. या अँपमध्ये अनेक सुविधा आल्या असून प्ले स्टोअरवर क्रमांक एकवर पोहचला आहे.
नवीन अँप आले मार्केटमध्ये
WhatsApp चा वापर सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. यामाध्यमातून फोटो, व्हिडीओ आणि ऑडिओ शेअर केला जातो. आता एक नवीन अँप व्हाट्स अँप सारखेच मार्केटमध्ये आले आहे.
नवीन App मध्ये कोणते फीचर्स दिले?
यात व्हॉइस-व्हिडिओ कॉलिंग, मीडिया शेअरिंग, ग्रुप्स आणि डेस्कटॉप सपोर्ट यासारखे फीचर्स आहेत. Arattai या App मध्ये नवीन फीचर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्ले स्टोअरवर App पोहचले १ नंबरला
प्ले स्टोअरवर हे App अधिकृतपणे क्रमांक एकवर पोहचले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे अॅप लो-एंड डिव्हाइस आणि कमकुवत नेटवर्कवरही स्मूथ चालेल.
Arattai App चे खास फीचर्स कोणते?
युजर्स १ टू १ चॅट, ग्रुप चॅट आणि मीडिया शेअरिंग करता येणार आहे. Arattai App मध्ये व्हाईस नोट फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज पाठविण्याचा पर्यायही आहे.
व्हाईस कॉल आणि व्हिडीओ कॉल सुविधा उपलब्ध
कॉलिंगसाठी युजर्स थेट चॅटवरून व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल करू शकतात. Arattai App केवळ गप्पा मारण्यापुरते मर्यादित नाही. यात ग्रुप डिस्कशन, चॅनेल्स, स्टोरीज, मीटिंग्ज अशी फीचर्स आहेत.
प्रायव्हसी जाणून घ्या
युजर्स ऑनलाईन मीटिंग्ज शेड्यूल करू शकतात, सह-होस्ट जोडू शकतात आणि टाइमझोन सेट करू शकतात. Arattai App वरील व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल पूर्णपणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत.

