- Home
- India
- Bihar Election 2025 Survey : नितीशकुमार-भाजपची सत्ता? इंडिया आघाडी आणि प्रशांत किशोर यांना किती मते मिळणार?
Bihar Election 2025 Survey : नितीशकुमार-भाजपची सत्ता? इंडिया आघाडी आणि प्रशांत किशोर यांना किती मते मिळणार?
Bihar Election 2025 Survey : टाईम्स नाऊ आणि JVC ने केलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या सर्वेक्षणात एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चला पाहूया ती आघाडी कोणती आहे.

बिहार विधानसभा निवडणूक
बिहार विधानसभा निवडणुकीला काही महिनेच शिल्लक आहेत. खासगी मीडिया चॅनेल्स आणि काही संस्था निवडणूकपूर्व सर्वेक्षण करत आहेत. ही निवडणूक नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशीच पाहिली जात आहे.
टाईम्स नाऊ आणि JVC चा नवा सर्व्हे
टाईम्स नाऊ आणि JVC चा नवा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेनुसार, NDA आघाडीला 130 ते 150 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. भाजप स्वबळावर 66 ते 77 जागा जिंकेल. नितीश कुमार यांचा JDU 52 ते 58 आणि NDA मधील इतर पक्ष 13-15 जागा जिंकतील, असा अंदाज आहे.
तेजस्वी यादव यांची महाआघाडी
टाईम्स नाऊ आणि JVC च्या सर्व्हेनुसार, तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला 81-103 जागा मिळू शकतात. लालूंचा RJD 71-87, काँग्रेस 11-14 आणि इंडिया ब्लॉकचे इतर पक्ष 13-18 जागा जिंकू शकतात.
जन सूरज पक्ष
बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर 'जन सूरज' पक्षासोबत उतरले आहेत. सर्व्हेनुसार, त्यांच्या पक्षाला फक्त 4 ते 6 जागा मिळू शकतात. या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसींचा AIMIM पक्षही उमेदवार उभे करणार आहे.
एआयएमआयएम पक्ष
2020 च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ने 5 जागा जिंकल्या होत्या. यावेळी हा आकडा कमी होईल, असा अंदाज आहे. AIMIM आणि BSP मिळून 5 ते 6 जागा जिंकू शकतात, असं सर्व्हेमध्ये म्हटलं आहे.
लालू यादव कुटुंब
लालू प्रसाद यादव यांचे कुटुंब विधानसभा निवडणुकीत एकसंघ दिसत नाहीये. याचा फटका तेजस्वी यादव यांना बसण्याची शक्यता आहे. शिवाय निवडणुकीत काही ठोस प्लान समोर ठेवण्यात तेजस्वी यादव अपयशी ठरत आहे, अशीही माहिती आहे.
एकहाती सत्ता
बिहार निवडणुकीत एकहाती सत्ता आणण्याचा भाजपली रणनिती होती. परंतु, ती यशस्वी होणार नाही. त्यामुळे नितीशकुमार यांना चेहरा पुढे करत भाजप राज्यात मुसंडी मारणार असल्याचे दिसून येत आहे.

