अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्यानीचा मृत्यू , 2024 मधील हि 10 वी घटना

| Published : Apr 06 2024, 08:17 AM IST / Updated: Apr 06 2024, 11:05 AM IST

muder 000

सार

2024 च्या सुरुवातीपासून, यूएसमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचे किमान १० तरी मृत्यू झाले आहेत.जाणून घ्या नेमकं प्रकरण काय

 

अमरनाथ घोष हत्येच्या काही दिवसानंतर लगेच अजून एका भारतीय विद्यार्थ्यांची हत्या झाल्याची घटना अमेरिकेतील ओहायो राज्यात घडली आहे. शुक्रवारी न्यूयॉर्क येथील भारतीय दूतावासाने हि बातमी "एक्स" वर पोस्ट टाकून सांगण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण समुदायावर शोककळा पसरली असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे. तसेच या घटनेचा पोलीस तपास करत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.

"क्लीव्हलँड, ओहायो येथील भारतीय विद्यार्थिनी उमा सत्य साई गड्डे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. हा मृत्यू कसा झाला नेमकं काय घडलं विद्यार्थ्यांबरोबर याचा तपास पोलीस करत असून आम्ही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचे देखील दूतावासाने संगितले आहे. तसेच उमा यांचे पार्थिव लवकरात लवकर भारतात पाठविले जाणार आहे.

2024 च्या सुरुवातीपासून, यूएसमध्ये भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांची हत्या केली जात आहे. हे सत्र सुरूच आहे आतापर्यंत किमान १० भारतीय किंवा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या महिन्यात भारतातील 34 वर्षीय प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना अमरनाथ घोष यांची सेंट लुईस, मिसुरी येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.हि घटना ताजी असतानाच पुन्हा एका उमा नावाच्या विद्यार्थ्यांची हत्या होणं हि अत्यंत दुःखद बाब आहे. तसेच पर्ड्यू युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेला 23 वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थी समीर कामथ 5 फेब्रुवारी रोजी इंडियाना येथे मृत अवस्थेत आढळला होता. त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारी रोजी, वॉशिंग्टनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर झालेल्या हल्ल्यात 41 वर्षीय भारतीय वंशाचे आयटी एक्झिक्युटिव्ह विवेक तनेजा यांना जीवघेणी दुखापत झाली, ज्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत भारतीय किंवा भारतीय-अमेरिकन व्यक्तीचा हा सातवा मृत्यू झाला असल्याचे अमेरिकेतील पोलिसांनी सांगितले आहे.

भारतीय आणि भारतीय वंशाच्या विद्यार्थी किंवा व्यक्तींवर झालेल्या हल्ल्यामुळे वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास आणि त्याच्या विविध ठिकाणच्या वाणिज्य दूतावासांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण यूएसमधील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. तसेच विद्यार्थ्यांना अश्या घटना घडत असल्याचं त्वरित संपर्क साधायला सांगितलं असून अशा विविध पैलूंवर मार्गर्शन करण्यात आले आहे. प्रभारी राजदूत श्रीप्रिया रंगनाथन यांच्या नेतृत्वाखालील 90 यूएस विद्यापीठांमधील सुमारे 150 भारतीय विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.