वाढत्या बेरोजगारीवर मात करण्यासाठी सरकार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना राबवत आहे. या योजनेअंतर्गत मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्याजमुक्त कर्ज दिले जाते, ज्यामुळे ते आत्मनिर्भर होऊ शकतील.
सध्याच्या काळात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असतो पण पैसे मिळतं नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारच्या वतीने एक महत्वपूर्ण योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेचे नाव अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना नावाने ओळखण्यात येत आहे.
योजनेबद्दल ची माहिती जाणून घ्या
मराठी समाजातील तरुणांसाठी ही एक मोठी संधी असून या तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करायचा आहे, त्यांना या योजनेतून खूप मदत होणार आहे. या योजनेतून आर्थिक मदत कर केली जात असून मराठा तरुणांना उद्योजक बनवणे हेच याचे महत्त्वाचे ध्येय आहे.
योजनेचे काय आहेत फायदे?
या योजनेतून आपल्याला व्याज मुक्त कर्ज मिळणार असून हा आपल्या व्यवसायासाठी खूप मोठा फायदा राहील. यामुळे आपल्याला कर्जाची परतफेड करताना कोणत्या अतिरिक्त आर्थिक भार पाडणार नाही. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर आणि योग्य व्यवसाय योजना सांगितल्यावर आपल्याला कमी वेळेत कर्ज मिळू शकेल. या योजनेमुळे तरुण आत्मनिर्भर होण्याची संधी मिळणार आहे. ही योजना केवळ एकाच प्रकारच्या व्यवसायासाठी मर्यादित नसून आपण कोणत्याही उद्योगासाठी आपण त्याचा वापर करू शकता.
योजनेसाठी काय आहे पात्रता
अर्जदार हा मराठा समाजातील असावा त्याचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावं. अर्जदाराकडे त्याच्या व्यवसायाची योग्य आणि सविस्तर माहिती असायला हवी.
अर्ज कसा करावा?
या योजनेसाठी अर्ज करणे सोपे असून आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अकागतपत्रे आणि अर्ज करण्याची संपूर्ण सविस्तर माहिती मिळेल.
ही एक चांगली सुवर्णसंधी असून तरुणांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून पाठबळ देण्यात येत आहे. आपणही आपल्या पायावर उभे राहण्याची इच्छुक असाल तर या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्या.
