China Travel: एका भारतीय ट्रॅव्हल व्लॉगर जोडप्याने चीनमधील प्रवासाच्या खर्चाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. त्यांच्या मते, भारताच्या तुलनेत चीनमध्ये लक्झरी हॉटेल्स, टॅक्सी प्रवास आणि जेवण खूपच स्वस्त आहे.

ट्रॅव्हल ब्लॉगर स्वाती आणि प्रतीक यांनी शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या जोडप्याने गेल्या वर्षी आपली नोकरी सोडून जग फिरायला सुरुवात केली. 2025 मध्ये संपूर्ण भारत फिरल्यानंतर 2026 मध्ये ते चीनला पोहोचले. चीन खूप महाग देश आहे, असा एक गैरसमज आहे, पण तो चुकीचा असल्याचं त्यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या मते, भारताच्या तुलनेत चीनमध्ये अनेक गोष्टी परवडणाऱ्या दरात मिळतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

त्यांनी तीन मुख्य गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली म्हणजे लक्झरी हॉटेल्स. भारतातल्या मोठ्या हॉटेल्समध्ये खूप पैसे मोजावे लागतात, पण चीनमध्ये त्यांना फक्त 1,800 रुपयांमध्ये चांगल्या सोयीसुविधा असलेली हॉटेल रूम मिळाली, असा त्यांचा दावा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रवासाचा खर्च. त्यांनी 30 मिनिटांच्या BMW टॅक्सी प्रवासासाठी फक्त 600 रुपये दिले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेवण. एका चांगल्या रेस्टॉरंटमध्ये चायनीज नूडल्ससाठी त्यांना फक्त 170 रुपये लागले, असंही त्यांनी सांगितलं.

View post on Instagram

युझरने काय कमेंट केल्या -

ही व्हिडिओ शेअर होताच लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने कमेंट केली की, 'जास्त टॅक्स आणि अनियंत्रित दरवाढीमुळे भारत महाग झाला आहे.' दुसऱ्या एकाने भारतातील टॅक्सी सर्व्हिसवर टीका केली. तो म्हणाला, 'थायलंडमधल्या टॅक्सीसुद्धा भारतातल्या टॅक्सींपेक्षा चांगल्या आहेत. भारतातल्या उबर टॅक्सी तर अनेकदा अस्वच्छ असतात.' तर काही जणांनी वेगळं मत मांडलं. त्यांच्या मते, चीनमधील कमी किमती तिथल्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि कंपन्यांमधील स्पर्धेमुळे आहेत, त्यामुळे त्याची भारताशी तुलना करणं योग्य नाही.