Worlds Largest Data Center : याठिकाणी उभारले जाणार जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर
Worlds Largest Data Center : सौदी डेटा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अथॉरिटीच्या मालकीचे 'हेक्सागॉन' डेटा सेंटर रियाधजवळील सलबूक येथे तीन कोटी चौरस फुटांपेक्षा जास्त क्षेत्रात बांधले जात आहे.

जगातील सर्वात मोठे डेटा सेंटर -
रियाधमध्ये जगातील सर्वात मोठ्या सरकारी डेटा सेंटरची पायाभरणी करण्यात आली. 'अपटाइम' इन्स्टिट्यूटच्या मते, क्षमतेच्या बाबतीत हे जगातील सर्वात मोठे सरकारी डेटा सेंटर आहे. याची एकूण क्षमता 480 मेगावॅट आहे.
उच्च पातळीची उपलब्धता -
सरकारी डेटा सेंटर्सना उच्च पातळीची उपलब्धता, सुरक्षा आणि कार्यक्षमता देण्यासाठी हे केंद्र सर्वोच्च आंतरराष्ट्रीय मानकांनुसार डिझाइन केले आहे.
पायाभरणी समारंभ -
या पायाभरणी समारंभाला तांत्रिक बाबींचे उप-गृहमंत्री अमीर डॉ. बंदर बिन अब्दुल्ला अलमशरी, अमीर फहाद बिन खालिद बिन फैसल, दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री इंजी. अब्दुल्ला बिन अमर अलस्वाहा आणि सरकारी एजन्सीचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
TIA 942 मानकांनुसार डिझाइन -
हे TIA 942 मानकांनुसार डिझाइन केलेले आहे. उच्च उपलब्धता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करणाऱ्या ड्युअल-मोड ऑपरेटिंग आर्किटेक्चरवर हे आधारित असेल. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाला सपोर्ट करण्यासाठी आणि राष्ट्रीय डिजिटल सेवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक प्रगत कॉम्प्युटिंग आर्किटेक्चरचाही समावेश आहे.
पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब -
या प्रकल्पात स्मार्ट आणि डायरेक्ट कूलिंग तंत्रज्ञान, तसेच अक्षय ऊर्जा यांसारख्या पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब केला जात आहे.
30,000 टन कार्बन उत्सर्जन -
हे दरवर्षी सुमारे 30,000 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत करेल. त्यामुळे हे जगातील सर्वात मोठ्या ग्रीन डेटा सेंटरपैकी एक बनेल.
10.8 अब्ज सौदी रियालचे योगदान -
हेक्सागॉन जीडीपीमध्ये सुमारे 10.8 अब्ज सौदी रियालचे योगदान देईल.

