- Home
- Utility News
- आता चिंता नको, WhatsApp चॅट आणि प्रायव्हसीची सुरक्षा वाढवता येणार, हे आहेत ७ महत्त्वाचे फिचर्स
आता चिंता नको, WhatsApp चॅट आणि प्रायव्हसीची सुरक्षा वाढवता येणार, हे आहेत ७ महत्त्वाचे फिचर्स
आपल्यापैकी बहुतेक जण चॅटिंगसाठी व्हॉट्सॲपचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सॲप मेसेजच्या सुरक्षेबद्दल आपल्याला चिंता वाटू शकते. तुमच्या व्हॉट्सॲपची सुरक्षा आणि प्रायव्हसी वाढवण्यासाठी हे ७ सोपे मार्ग जाणून घेऊ.

१. प्रायव्हसी चेकअप -
सेटिंग्जमधील 'प्रायव्हसी चेकअप' पर्यायामुळे तुम्ही तुमचा डीपी, स्टेटस, लास्ट सीन कोण पाहू शकेल हे ठरवू शकता. तसेच अनोळखी कॉल्स आणि ग्रुपमध्ये ॲड करण्यावर नियंत्रण ठेवू शकता.
२. डिसअपीअरिंग मेसेजेस -
व्हॉट्सॲप चॅट्स एंड-टू-एंड एन्क्रिप्शनने सुरक्षित असले तरी, तुमचे डिव्हाइस हॅक झाल्यास चॅट्स पाहिले जाऊ शकतात. त्यामुळे, 'डिसअपीअरिंग मेसेजेस' पर्याय सुरू केल्यास, ठरवलेल्या वेळेनंतर मेसेज आपोआप डिलीट होतील. तुम्ही यासाठी २४ तास, ७ दिवस किंवा ९० दिवसांचा कालावधी सेट करू शकता. सेटिंग्स > प्रायव्हसी > डिफॉल्ट मेसेज टायमर या पर्यायावरून तुम्ही हे सुरू करू शकता.
३. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन -
तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट आणि चॅट्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही 'पिन'सह 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' सुरू करू शकता. व्हॉट्सॲपच्या 'सेटिंग्ज'मधील 'अकाउंट'मध्ये जाऊन तुम्ही टू-स्टेप व्हेरिफिकेशन आणि पिन सेट करू शकता. भविष्यात हे सहज रिसेट करण्यासाठी तुम्ही ईमेल ॲड्रेसदेखील जोडू शकता. अकाउंटची सुरक्षा वाढवण्यासाठी 'पास-की' (Passkey) देखील वापरता येते.
४. ॲप लॉक आणि चॅट लॉक -
संपूर्ण व्हॉट्सॲप लॉक करण्याचे आणि विशिष्ट चॅट्स लॉक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. आयफोनमध्ये फेस आयडी आणि टच आयडीद्वारे, तर अँड्रॉइडमध्ये फिंगरप्रिंटद्वारे व्हॉट्सॲप अकाउंट लॉक करता येते. यासाठी व्हॉट्सॲप सेटिंग्जमधील प्रायव्हसी पर्यायातून 'ॲप लॉक' निवडा. एखाद्या विशिष्ट चॅटला अधिक सुरक्षा हवी असल्यास, तुम्ही ते 'चॅट लॉक' करू शकता. यासाठी सेटिंग्स > प्रायव्हसी > चॅट लॉक हा पर्याय निवडावा. तुम्ही कॉन्टॅक्टच्या माहितीमध्ये जाऊनही चॅट लॉक करू शकता.
५. ॲडव्हान्स्ड सेटिंग्स -
सायबर फसवणुकीपासून तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी व्हॉट्सॲपने काही ॲडव्हान्स्ड फीचर्स दिली आहेत. हे फीचर्स व्हॉट्सॲप सेटिंग्जमधील प्रायव्हसी पर्यायातील 'ॲडव्हान्स्ड' विभागात मिळतील. यामध्ये अनोळखी नंबरवरून येणारे मेसेज थांबवण्याची सुविधा, कॉल्समध्ये आयपी ॲड्रेस लपवण्याचे फीचर आणि लिंक प्रिव्ह्यू डिसेबल करण्याची सोय आहे.
६. ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी -
हे फीचर सुरू करण्यासाठी प्रत्येक वैयक्तिक आणि ग्रुप चॅटमध्ये जावे लागेल. हे फीचर तुमचे चॅट्स एआय ट्रेनिंगसारख्या कामांसाठी ॲपच्या बाहेर वापरण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच, मीडिया फाइल्स ऑटो-डाउनलोड होण्यापासून थांबवते. एखाद्या व्यक्तीच्या चॅटमध्ये हे फीचर सुरू करण्यासाठी, व्ह्यू कॉन्टॅक्ट > ॲडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी > टर्न इट ऑन या पर्यायाद्वारे तुम्ही ते सेट करू शकता.
७. वन-टाइम व्ह्यूइंग -
तुम्ही कोणाला फोटो किंवा व्हॉइस नोट पाठवताना अधिक प्रायव्हसी हवी असल्यास, 'वन-टाइम व्ह्यू' फीचर वापरू शकता. यासाठी मीडिया फाइल निवडल्यानंतर कॅप्शन फील्डमधील '1' आयकॉनवर टॅप करा आणि मगच 'सेंड' बटण दाबा. व्हॉइस नोट पाठवताना, रेकॉर्डिंग बटणावर टॅप करून वरच्या बाजूला स्वाइप केल्यास '1' आयकॉन दिसेल. अशाप्रकारे रेकॉर्ड केलेली व्हॉइस नोट फक्त एकदाच ऐकता येईल.

