Car Market: किया कारच्या कोणत्या मॉडेलला क्रॅश टेस्टमध्ये मिळाला फक्त 1 स्टार?
Car Market: भारतात तयार होणारी आणि अनेक देशांमध्ये निर्यात होणारी कियाची एक प्रसिद्ध SUV, नुकत्याच झालेल्या ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फक्त एका स्टारवर समाधान मानू शकली आहे. यामुळे कारच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
14

Image Credit : Kia Website
धक्कादायक सेफ्टी रेटिंग
भारतात बनवलेली आणि दक्षिण आफ्रिकेत विकली जाणारी किया सोनेट ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये नापास झाली आहे. या गाडीला सुरक्षेसाठी फक्त एक स्टार रेटिंग मिळालं आहे. यानंतर कारच्या सुरक्षेबद्दल पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

24
Image Credit : Kia website
टेस्टचे निकाल काय सांगतात?
या गाडीला कमी रेटिंग मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीत मिळालेले कमी गुण. गाडीत बेसिक सेफ्टी फीचर्स असूनही, अपघाताच्या वेळी तिची एकूण कामगिरी निराशाजनक ठरली.
34
Image Credit : Kia Website
भारतीय ग्राहकांनी काळजी करावी का?
हे सेफ्टी रेटिंग दक्षिण आफ्रिकेत विकल्या जाणाऱ्या मॉडेलसाठी आहे. त्यामुळे भारतातील सर्व व्हेरियंट्सना ते थेट लागू होईलच असं नाही. प्रत्येक देशाच्या नियमांनुसार कारच्या सेफ्टी फीचर्समध्ये बदल असू शकतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.
44
Image Credit : kia
सुरक्षा का महत्त्वाची आहे?
कार खरेदी करताना फक्त किंमत, डिझाइन आणि फीचर्स पाहू नका, तर तिची सुरक्षा किती मजबूत आहे हेही तपासा. मजबूत बनावट आणि आधुनिक सेफ्टी टेक्नॉलॉजी तुमचा जीव वाचवू शकते. त्यामुळे नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर सेफ्टी रेटिंग्स आणि फीचर्सची पूर्ण माहिती घेऊनच निर्णय घ्या.

