MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • Flight Safety : टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातले लाईट्स का बंद करतात?

Flight Safety : टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातले लाईट्स का बंद करतात?

तुम्ही कधी विमानातून प्रवास केला असेल, तर एक गोष्ट नक्की नोटीस केली असेल. टेकऑफ आणि लँडिंगच्या वेळी विमानातले लाईट्स बंद केले जातात. पण असं का करतात, हे तुम्हाला माहितीये का? यामागे काही खास कारणं आहेत.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 13 2026, 12:19 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
विमानातले लाईट्स का बंद करतात?
Image Credit : Getty

विमानातले लाईट्स का बंद करतात?

विमानातून प्रवास करताना तुम्ही एक गोष्ट नक्की पाहिली असेल. विमान टेकऑफ करताना आणि लँडिंगच्या वेळी केबिनमधले लाईट्स बंद केले जातात. प्रवाशांना शांत वाटावं म्हणून असं करतात, असा अनेकांचा समज असतो. पण यामागे सुरक्षेचं एक महत्त्वाचं कारण आहे. टेकऑफ आणि लँडिंगची वेळ खूप महत्त्वाची असते. या वेळी अचानक काही अडचण आली, तर प्रवाशांना तातडीने बाहेर काढावं लागतं. अशा परिस्थितीचा विचार करूनच विमान कर्मचारी ही काळजी घेतात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
प्रवाशांना तयार करण्यासाठी
Image Credit : Pixabay

प्रवाशांना तयार करण्यासाठी

विमानातले लाईट्स कमी केल्यामुळे प्रवाशांच्या डोळ्यांना कमी प्रकाशाची सवय होते. आपण जास्त प्रकाशातून अचानक अंधारात गेलो, तर डोळ्यांना स्पष्ट दिसायला थोडा वेळ लागतो. आणीबाणीच्या वेळी हा उशीर महागात पडू शकतो. म्हणूनच केबिनमधले लाईट्स आधीच कमी केले जातात. यामुळे बाहेर अंधार असला तरी प्रवाशांना आजूबाजूचा परिसर ओळखायला सोपं जातं. विमानातला वीजपुरवठा खंडित झाला तरी ही काळजी उपयोगी पडते. विशेषतः रात्रीच्या प्रवासात याचा खूप फायदा होतो.

Related Articles

Related image1
Indian Railways Seat Allocation : एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमध्ये सीट कशी मिळते? जाणून घ्या नियम
33
इमर्जन्सी दरवाजे स्पष्ट दिसण्यासाठी
Image Credit : Pixabay

इमर्जन्सी दरवाजे स्पष्ट दिसण्यासाठी

विमानात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली, तर बाहेर पडण्यासाठी खास दरवाजे असतात. ते ओळखण्यासाठी एक्झिट बोर्ड आणि जमिनीवर इमर्जन्सी लाईट्स लावलेले असतात. केबिनमधला प्रकाश कमी झाल्यावर हे लाईट्स अगदी स्पष्ट दिसतात. यामुळे प्रवाशांना सुरक्षित बाहेर पडण्याचा रस्ता पटकन सापडतो. खिडक्यांचे पडदे उघडे ठेवल्यामुळे कर्मचाऱ्यांना बाहेरची परिस्थितीही पाहता येते. समजा एका बाजूला आग किंवा धूर दिसला, तर तिथून प्रवाशांना न पाठवता दुसरा रस्ता निवडता येतो. लाईट्स कमी करणं ही छोटी गोष्ट वाटत असली, तरी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ती खूप महत्त्वाची असते.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indian Railways Seat Allocation : एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमध्ये सीट कशी मिळते? जाणून घ्या नियम
Recommended image2
TCS Jobs : टीसीएसमध्ये नोकरी हवीये? फक्त ChatGPT येऊन चालणार नाही, 'हे' स्किल्स लागतीलच
Recommended image3
WhatsApp Message Scheduling : व्हॉट्सॲपवर आता मेसेज आधीच शेड्युल करता येणार, जबरदस्त फीचर
Recommended image4
Mental Health Insurance : थेरपीचा खर्च इन्शुरन्समध्ये कव्हर होतो का? जाणून घ्या
Recommended image5
Budget Mileage Bikes : 70 किमी मायलेज, किंमत फक्त 58,850 रुपये; ऑफिससाठी बेस्ट 6 बाईक्स
Related Stories
Recommended image1
Indian Railways Seat Allocation : एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना ट्रेनमध्ये सीट कशी मिळते? जाणून घ्या नियम
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved