व्हॉट्सअॅप वेबवर कॉल करताना सतत Reconnecting दाखवतंय? कॉल कनेक्ट होत नाहीये किंवा मध्येच कट होतोय? जाणून घ्या या समस्येचं कारण आणि त्यावरचे सोपे उपाय.
मुंबई : व्हॉट्सअॅप वेबवरून कॉल करताना तुम्हाला वारंवार Reconnecting असा मेसेज दिसतोय का? कॉल कनेक्ट होत नाहीये किंवा मध्येच तुटतोय? अनेक जण ऑफिसमध्ये काम करताना WhatsApp Web वरून कॉल करतात, पण नेटवर्क किंवा ब्राउझरमधील छोट्या त्रुटींमुळे कॉल मध्येच अडकतो.
जाणून घ्या सोपे उपाय
१. WhatsApp Web रिफ्रेश करा. सर्वात आधी व्हॉट्सअॅप वेबचा टॅब बंद करून पुन्हा ओपन करा. हवं तर Ctrl + R दाबून पेज रिफ्रेश करा. फोनमधील व्हॉट्सअॅप उघडून तिथे इंटरनेट कनेक्टेड आहे का हे एकदा तपासा. एखादा तात्पुरता ग्लिच असेल तर तो यानेच दूर होईल.
२. ब्राउझर अपडेट आणि परवानग्या तपासा. जुन्या ब्राउझरमुळेही कॉलची समस्या येऊ शकते. Chrome, Edge किंवा Firefox चं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल करा. त्यानंतर ब्राउझरच्या अॅड्रेस बारच्या डाव्या बाजूला असलेल्या लॉक आयकॉनवर क्लिक करून तपासा - Microphone आणि Camera ची परवानगी Allow केलेली आहे का. Allow नसेल तर कॉल कनेक्ट होणार नाही.
३. इंटरनेट आणि VPN बंद करा. WhatsApp कॉलसाठी चांगलं इंटरनेट असणं गरजेचं आहे. कम्प्युटर आणि फोन दोन्ही एका चांगल्या नेटवर्कला कनेक्टेड आहेत ना हे पाहा. जर कम्प्युटरवर VPN किंवा Proxy सुरू असेल, तर ते बंद करून पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न करा. VPN मुळे बऱ्याचदा कॉलला Reconnecting दाखवलं जातं.
४. ब्राउझरचा कॅशे क्लिअर करा. खूप दिवसांचा कॅशे साचून राहिल्यास WhatsApp Web व्यवस्थित काम करत नाही. ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Clear Browsing Data मधून कॅशे आणि कुकीज क्लिअर करा. त्यानंतर पुन्हा QR कोड स्कॅन करून लॉग इन करा.
५. WhatsApp डेस्कटॉप अॅप वापरा. जर ब्राउझरमध्ये सतत समस्या येत असेल, तर व्हॉट्सअॅपचं अधिकृत डेस्कटॉप अॅप डाऊनलोड करा. ब्राउझरच्या तुलनेत अॅपवर कॉल अधिक स्थिर असतो आणि कट होण्याची शक्यता कमी असते.
हे सगळे उपाय करूनही जर कॉल लागत नसेल, तर एकदा तुमचा कम्प्युटर रिस्टार्ट करून बघा.
















