MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • EPFO WhatsApp : व्हॉट्सॲपवर फक्त 'Hi' पाठवा आणि पीएफ बॅलन्स पाहा, पासबुक असं तपासा

EPFO WhatsApp : व्हॉट्सॲपवर फक्त 'Hi' पाठवा आणि पीएफ बॅलन्स पाहा, पासबुक असं तपासा

EPFO सदस्य आता तुम्ही व्हॉट्सॲपवरूनच तुमचा पीएफ बॅलन्स आणि शेवटचे ५ ट्रान्झॅक्शन्स तपासू शकता. तसंच पासबुकही डाऊनलोड करू शकता. जाणून घ्या याची सोपी पद्धत.

3 Min read
Author : Karishma R
Published : Nov 18 2026, 11:19 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी   हा नंबर सेव्ह करा
Image Credit : Chatgpt తో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी - हा नंबर सेव्ह करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या सदस्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी मेंबर पोर्टलवर वारंवार लॉग इन करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या फोनमधील व्हॉट्सॲपवरूनच थेट पीएफ बॅलन्स आणि शेवटचे ५ ट्रान्झॅक्शन्स पाहू शकता. याशिवाय पीएफ पासबुक देखील अत्यंत सोप्या पद्धतीने ॲक्सेस करता येईल.

कर्मचाऱ्यांना त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडची माहिती सहज मिळावी, यासाठी ही नवीन व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी ईपीएफओच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त या नवीन सुविधेचा शुभारंभ केला. या सेवेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरूनच ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करणे आवश्यक आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
व्हॉट्सॲपवर पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?
Image Credit : chatgpt తో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

व्हॉट्सॲपवर पीएफ बॅलन्स कसा तपासायचा?

ईपीएफओने दिलेल्या +91 87964 41800 या खास व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज पाठवून तुम्ही या सेवेचा वापर करू शकता. त्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

१. नंबर सेव्ह करा: सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये +91 87964 41800 हा नंबर सेव्ह करा. किंवा ईपीएफओच्या अधिकृत घोषणेत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही तुम्ही थेट चॅट सुरू करू शकता.

२. मेसेज पाठवा: व्हॉट्सॲप उघडा आणि सेव्ह केलेल्या नंबरवर 'Hi' असा मेसेज पाठवा.

३. भाषा निवडा: चॅटबॉट तुम्हाला एक वेलकम मेसेज पाठवेल आणि तुम्हाला हवी असलेली भाषा निवडण्यास सांगेल.

४. बॅलन्स पर्याय: चॅटमध्ये दिसणाऱ्या मेनूमधून तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासण्याचा पर्याय निवडा.

५. ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन: तुमची ओळख पटवण्यासाठी स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करा. तुमच्या UAN शी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा.

६. पीएफ खाते निवडा: व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर, जर तुमच्या UAN ला एकापेक्षा जास्त खाती लिंक असतील, तर तुम्हाला हवे असलेले पीएफ खाते किंवा मेंबर आयडी निवडा.

७. बॅलन्सची माहिती: चॅटबॉट लगेच तुमच्या निवडलेल्या खात्यातील बॅलन्सची माहिती स्क्रीनवर दाखवेल. त्यानंतर तिथे असलेल्या पर्यायांवरून तुम्ही पासबुक पाहू शकता किंवा मुख्य मेनूमध्ये परत जाऊ शकता.

Related Articles

Related image1
PF खातेदारांनो सावधान! EPFOच्या नावाने येणाऱ्या फेक लिंकवर क्लिक करण्याआधी हे नक्की तपासा
Related image2
PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
36
व्हॉट्सॲपवरून ईपीएफ पासबुक कसे डाऊनलोड करायचे?
Image Credit : Gemini తో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

व्हॉट्सॲपवरून ईपीएफ पासबुक कसे डाऊनलोड करायचे?

तुमच्या खात्यात जमा झालेले पैसे आणि ट्रान्झॅक्शन्स पाहण्यासाठी पासबुक खूप महत्त्वाचे असते. पासबुक डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही याच व्हॉट्सॲप सेवेचा वापर करू शकता. सुरुवातीला ईपीएफओच्या व्हॉट्सॲप चॅटवर 'Hi' पाठवा. त्यानंतर मेनूमधून पासबुक डाऊनलोडचा पर्याय निवडा.

ओटीपी व्हेरिफिकेशन पूर्ण करा आणि विचारल्यास संबंधित पीएफ खाते निवडा. चॅटबॉट लगेच तुमचे पासबुक तुम्हाला पाठवून देईल. यातून कर्मचारी आणि कंपनीचा वाटा योग्य प्रकारे जमा होत आहे की नाही, हे तुम्ही तपासू शकता. तसेच पैसे काढण्याचे (withdrawals) आणि इतर व्यवहारही ट्रॅक करू शकता.

46
शेवटचे ५ पीएफ ट्रान्झॅक्शन्स कसे पाहायचे?
Image Credit : Gemini తో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

शेवटचे ५ पीएफ ट्रान्झॅक्शन्स कसे पाहायचे?

ईपीएफओ पोर्टलवर न जाता तुम्ही तुमच्या खात्यातील शेवटचे ५ व्यवहार व्हॉट्सॲपवरच पाहू शकता. अधिकृत ईपीएफओ नंबरवर चॅट सुरू केल्यानंतर, मेनूमध्ये असलेला 'Last 5 Transactions' हा पर्याय निवडा. ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन पूर्ण करा. संबंधित पीएफ खाते निवडल्यावर तुमचे नुकतेच झालेले ट्रान्झॅक्शन्स स्क्रीनवर दिसतील.

56
व्हॉट्सॲप सेवा चालत नसेल तर काय करावे?
Image Credit : Gemini తో రూపొందించిన ప్రతీకాత్మక చిత్రం

व्हॉट्सॲप सेवा चालत नसेल तर काय करावे?

ही सेवा नुकतीच सुरू झाली असल्याने, चॅटबॉट वापरताना किंवा ओटीपी मिळताना काही वेळा तांत्रिक समस्या येऊ शकतात. अशा वेळी तुम्ही योग्य ईपीएफओ नंबरवर मेसेज करत आहात ना, आणि तुमचा मोबाईल नंबर UAN सोबत रजिस्टर आहे ना, याची खात्री करून घ्या.

जर व्हेरिफिकेशन फेल झाले, तर थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. व्हॉट्सॲप सुविधा उपलब्ध नसल्यास, तुम्ही नेहमीप्रमाणे ईपीएफओ मेंबर पोर्टल किंवा उमंग (Umang) ॲपचा वापर करून तुमचे पासबुक आणि इतर माहिती मिळवू शकता.

66
खोट्या नंबरपासून सावध राहा
Image Credit : Asianet News

खोट्या नंबरपासून सावध राहा

ही व्हॉट्सॲप सेवा वापरताना सदस्यांनी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. फक्त ईपीएफओच्या अधिकृत व्हॉट्सॲप नंबरवरच चॅट करा. कोणीही स्वतःला संस्थेचा प्रतिनिधी सांगून तुमचा UAN पासवर्ड, बँक डिटेल्स, एटीएम पिन किंवा इतर खाजगी माहिती मागितल्यास ती अजिबात शेअर करू नका.

फक्त अधिकृत व्हेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यानच ओटीपी टाका. विशेष म्हणजे, ही व्हॉट्सॲप सुविधा फक्त पीएफ खात्याची माहिती सोप्या पद्धतीने मिळवण्यासाठीच आहे. यातून पीएफ काढण्याचा दावा करणे किंवा पीएफ बॅलन्स ट्रान्सफर करणे शक्य नाही.

Utility News (उपयुक्तता बातम्या): Check Latest उपयुक्तता बातम्या थेट in Marathi. Read वैयक्तिक कर्ज, बँकिंग टिप्स, गुंतवणूक, सोने आणि चांदीच्या किंमती बातम्या, ताज्या बातम्या at Asianet Marathi News .

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
उपयुक्तता बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Bajaj Pulsar 180 : रीलॉन्च होऊन 6 महिन्यातच गायब झाली बजाज पल्सर 180...कारण काय?
Recommended image2
Petrol Diesel Prices : पेट्रोल, डिझेलचे आजचे दर काय? मुंबईसह प्रमुख शहरांतील भाव तपासा
Recommended image3
Gold Rate Today : आजचे सोने-चांदीचे दर, 18 नोव्हेंबर; दिवाळीनंतर किती बदलला भाव?
Recommended image4
Chaat Masala Recipe: ५ मिनिटांत घरीच बनवा चटपटीत चाट मसाला, पाहा सोपी पद्धत
Recommended image5
Bajaj Pulsar 180: रिलांचनंतर सहाच महिन्यात बजाज पल्सर १८० पुन्हा बंद? जाणून घ्या खरं कारण
Related Stories
Recommended image1
PF खातेदारांनो सावधान! EPFOच्या नावाने येणाऱ्या फेक लिंकवर क्लिक करण्याआधी हे नक्की तपासा
Recommended image2
PF Money Investment Options : पीएफचा पैसा कुठे गुंतवावा? सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे 7 पर्याय
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved