WhatsApp Trick: मेसेज डिलीट झालाय? चिंता नको, 'या' सोप्या ट्रिकने परत वाचा!
WhatsApp Trick: अनेकदा कुणीतरी व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवून लगेच “Delete for Everyone” करतं. मग तो मेसेज काय होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता लागते. यासाठी सहसा थर्ड-पार्टी अॅप्स वापरली जातात. त्याशिवायही एक सोपा मार्ग आहे, तो तुम्हाला माहीत आहे का?
15

Image Credit : Gemini AI
ही ट्रिक कधी काम करते?
ही पद्धत तेव्हाच काम करते, जेव्हा तुमच्या व्हॉट्सअॅपमध्ये चॅट बॅकअप फीचर आधीपासून सुरू असेल. महत्त्वाचं म्हणजे, मेसेज डिलीट होण्यापूर्वी बॅकअप घेतला गेला पाहिजे. उदाहरणार्थ, रात्री 8 वाजता मेसेज आला, 8.15 ला बॅकअप झाला आणि 8.30 ला तो डिलीट झाला, तर जुना बॅकअप रिस्टोअर केल्यावर तो मेसेज दिसेल.
Add Asianetnews Marathi as a Preferred Source

25
Image Credit : Gemini AI
आधी बॅकअपची वेळ तपासा
सर्वात आधी तुमच्या व्हॉट्सअॅपचा शेवटचा बॅकअप कधी घेतला गेला, हे तपासा. आयफोन युझर्सनी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'चॅट्स' आणि मग 'चॅट बॅकअप' निवडावं. अँड्रॉइड युझर्सनाही सेटिंग्समधील 'चॅट्स'मध्ये 'चॅट बॅकअप'चा पर्याय मिळेल. डिलीट झालेला मेसेज बॅकअपच्या वेळेपूर्वी आलेला असेल, तरच तो परत मिळवता येतो.
35
Image Credit : Getty
व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करून पुन्हा इन्स्टॉल करा
बॅकअपची माहिती तपासल्यानंतर, तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप अॅप काढून टाका (अनइन्स्टॉल करा). त्यानंतर अॅप स्टोअर किंवा गुगल प्ले स्टोअरवरून ते पुन्हा इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा. यानंतर व्हॉट्सअॅप आपोआप जुना बॅकअप शोधेल आणि तुम्हाला 'Restore' चा पर्याय देईल. त्यावर क्लिक करा.
45
Image Credit : Getty
डिलीट झालेला मेसेज पुन्हा कसा दिसेल?
तुम्ही बॅकअप 'रिस्टोअर' केल्यावर, जर तो डिलीट झालेला मेसेज बॅकअपमध्ये सेव्ह असेल, तर तो तुमच्या चॅटमध्ये पुन्हा दिसेल. यासोबतच फोटो आणि व्हिडिओसारख्या मीडिया फाइल्सही परत मिळतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅकअप घेतल्यानंतर आलेले नवीन मेसेज मात्र रिस्टोअर केल्यावर दिसणार नाहीत.
55
Image Credit : Getty
ही पद्धत वापरण्यापूर्वी जाणून घ्या
ही ट्रिक प्रत्येक वेळी काम करेलच असं नाही. जर तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप बॅकअप आधीपासून सुरू नसेल, तर डिलीट झालेले मेसेज परत मिळवणे शक्य नाही. त्यामुळे, महत्त्वाच्या चॅट्ससाठी Google Drive किंवा iCloud वर नियमित बॅकअप सुरू ठेवणे नेहमीच फायद्याचे ठरते.

