सावधान, लग्नात दागिने खरेदी करताना होईल फसवणूक; घ्या हि काळजी अन्यथा...
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यांची शुद्धता, हॉलमार्किंग, कॅरेट आणि घडणावळ तपासणे महत्त्वाचे आहे. सोन्याचे दर रोज बदलत असल्याने खरेदीपूर्वी दर तपासणे आणि घडणावळीचा खर्च समजून घेणे आवश्यक ठरते.

सावधान, लग्नात दागिने खरेदी करताना होईल फसवणूक; घ्या हि काळजी अन्यथा
सोन्याचे दागिने लग्नाच्या वेळेला घेताना काळजी घ्यायला हवी. आपण किती वजनाचे दागिने घेतोय, त्यावर हॉलमार्किंग आहे का हे तपासून पाहायला हवं. त्यामुळं आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेऊयात.
दागिन्यांची खात्री करून घ्या
दागिने किती कॅरेटचा आहे हे आपण स्वतः खात्री करून घ्यावी. दागिन्यांवर k आणि त्याच्या पुढं किती कॅरेटचा आहे ते लिहिलेलं असतं. आपण २४ कॅरेटचे दागिने शक्यतो बनवत नाही.
सोने खरेदीला जाताना त्यादिवशीची दर पाहून तपासून पहा
सोने खरेदीला जाताना त्यादिवशीचा दर पाहून तपासून घेत जा. सोन्याचे दर नेहमी बदलत असतात, त्यामुळं आपण नेहमीच तपासून पाहायला हवं.
दागिन्यांचे दर सगळीकडे सारखा नसतो
दागिन्यांचे दर सगळीकडे सारखा नसतो. घडणावळीचा दर हा वेगळा असतो. कलात्मक दागिन्यांचा दर घडणावळीवर दर जास्त असतो. सोन्याच्या दरामध्ये ६ टक्के ते १४ टक्के घडणावळ लावली जाते.
खडे दागिन्यांपेक्षा दागिने वाटतात छान
साध्या दागिन्यांपेक्षा खडे जडवलेले दागिने छान वाटतात. पण यामुळे दागिन्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. सोन्याचे दागिने करताना त्याच वजन किती, घडणावळीला किती पैसे लागतील याचा अभ्यास करून निर्णय घ्यावा.
दागिने विकायची वेळ आल्यास कोणाला विकावेत?
दागिने विकायची वेळ आल्यास ते ब्रँडेड दुकानात जाऊनच विकावेत. त्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला दागिन्यांचा भाव हा १००% मिळत असतो. दागिने मोडताना त्यामध्ये घट मोजली जाते हे लक्षात ठेवाव.

