MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Utility News
  • शेतजमिनीची सरकारी मोजणी होऊनही शेजाऱ्याचा वाद? जाणून घ्या 'हे' कायदेशीर पर्याय आणि दाद मागण्याची पद्धत

शेतजमिनीची सरकारी मोजणी होऊनही शेजाऱ्याचा वाद? जाणून घ्या 'हे' कायदेशीर पर्याय आणि दाद मागण्याची पद्धत

Agricultural Land Survey Dispute: शेतजमिनीची सरकारी मोजणी होऊनही शेजारी हद्द मान्य करत नसेल, तर कायदेशीर मार्गांचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. तहसीलदारांकडे हरकत नोंदवण्यापासून ते दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यापर्यंतचे टप्पे या लेखात दिले आहेत. 

2 Min read
Author : Rameshwar Gavhane
Published : Mar 03 2026, 05:05 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
शेतजमिनीची सरकारी मोजणी होऊनही शेजाऱ्याचा वाद?
Image Credit : social media

शेतजमिनीची सरकारी मोजणी होऊनही शेजाऱ्याचा वाद?

पुणे : ग्रामीण भागात शेतजमिनीच्या बांधावरून किंवा हद्दीवरून वाद होणे ही पाचवीला पुजलेली बाब आहे. अनेकदा महसूल विभागामार्फत अधिकृत मोजणी केली जाते, तरीही काही वेळा शेजारील जमीनमालक ती हद्द मान्य करत नाहीत किंवा मोजणीत त्रुटी असल्याचा दावा करतात. अशा वेळी हातघाईवर न येता कायद्याचा आधार घेऊन हा प्रश्न कसा सोडवता येतो, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
मोजणी प्रक्रिया नक्की कशी पार पडते?
Image Credit : gemini

मोजणी प्रक्रिया नक्की कशी पार पडते?

शेतजमिनीची मोजणी ही भू-अभिलेख विभाग आणि महसूल प्रशासनामार्फत केली जाते. यात सातबारा, फेरफार नोंदी आणि 'टीपण' (जुने नकाशे) यांचा आधार घेतला जातो. मोजणीवेळी दोन्ही बाजूंच्या खातेदारांना नोटीस देऊन उपस्थित राहण्याची संधी दिली जाते, जेणेकरून पारदर्शकता राहील. 

Related Articles

Related image1
दक्षिण पुणेकरांचा प्रवास होणार 'सुसाट'! शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोचा मार्ग मोकळा; जाणून घ्या काय आहे प्लॅन
Related image2
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
35
मोजणी मान्य नसेल तर काय करावे? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक)
Image Credit : unsplash

मोजणी मान्य नसेल तर काय करावे? (स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शक)

१. तहसीलदारांकडे लेखी हरकत

जर तुम्हाला मोजणीच्या अहवालात त्रुटी वाटत असतील, तर तुम्ही संबंधित तहसील कार्यालयात लेखी हरकत नोंदवू शकता. मोजणी योग्य झाली नसल्याचे तांत्रिक पुरावे देऊन तुम्ही 'पुनर्मोजणी'ची मागणी करू शकता.

२. उपविभागीय अधिकारी (SDO) आणि अपील

तहसीलदारांच्या निर्णयावर समाधान झाले नाही, तर तुम्ही उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) यांच्याकडे अपील करू शकता. त्यानंतरही जिल्हाधिकारी किंवा विभागीय आयुक्तांकडे दाद मागण्याची तरतूद महसूल कायद्यात आहे.

३. दिवाणी न्यायालयाचा (Civil Court) पर्याय

महसूल प्रशासनाकडून न्याय मिळाला नाही, तर 'सीमा निश्चिती'साठी (Boundary Dispute) दिवाणी न्यायालयात दावा दाखल करता येतो. न्यायालय स्वतःहून एखादा 'कमिशनर' (सर्वेक्षक) नेमून जमिनीची वस्तूस्थिती तपासून अंतिम निकाल देऊ शकते, जो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. 

45
पोलीस तक्रार कधी करावी?
Image Credit : social media

पोलीस तक्रार कधी करावी?

जमिनीचा वाद हा प्रामुख्याने दिवाणी स्वरूपाचा असतो. मात्र, हद्दीच्या वादातून जर कुणी जबरदस्तीने अतिक्रमण, बांधकाम किंवा पिकांचे नुकसान करत असेल, तर शांतता राखण्यासाठी तुम्ही स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार देऊ शकता. 

55
वाद टाळण्यासाठी 'हे' करा
Image Credit : social media

वाद टाळण्यासाठी 'हे' करा

कागदपत्रे अपडेट ठेवा: तुमचा सातबारा आणि फेरफार नोंदी वेळोवेळी तपासा.

डिजिटल नकाशा: सध्या शासनाने डिजिटल नकाशे उपलब्ध करून दिले आहेत, त्याचा आधार घ्या.

सामंजस्य: शक्य असल्यास गावातील तंटामुक्त समिती किंवा ज्येष्ठ व्यक्तींच्या मध्यस्थीने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून वेळ आणि पैसा वाचेल.

महत्त्वाची टीप: मोजणी झाल्यानंतर संबंधित सर्वेक्षकाने दिलेल्या 'मोजणी पावती' आणि 'नकाशा' यांची प्रत जपून ठेवा. भविष्यातील कायदेशीर लढाईत हे तुमचे सर्वात प्रबळ पुरावे ठरतात.

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
उपयुक्तता बातम्या

Recommended Stories
Recommended image1
PF Withdrawal Rules : EPFO 3.0 मुळे पीएफ काढणे होणार सोपे! आता UPI द्वारे थेट खात्यात पैसे; किती रक्कम काढता येणार?
Recommended image2
डेली वेअरसाठी ६ सिल्क पायल करा खरेदी, आपण खरेदी करा हे डिझाईन
Recommended image3
Kitchen Tips: पहिल्यांदाच स्वयंपाक करताय? मग या किचन टिप्स नक्की लक्षात ठेवा
Recommended image4
Mobile Lost: 10 मिनिटांत करा 'या' 5 गोष्टी, नाहीतर बँक अकाऊंट होईल रिकामं!
Recommended image5
Kitchen Tips: कुकर छोटा असो वा मोठा, पाणी बाहेर येणार नाही! वापरा ही सोपी ट्रिक
Related Stories
Recommended image1
दक्षिण पुणेकरांचा प्रवास होणार 'सुसाट'! शिवाजीनगर ते येवलेवाडी मेट्रोचा मार्ग मोकळा; जाणून घ्या काय आहे प्लॅन
Recommended image2
रेशन कार्डधारकांसाठी गुड न्यूज! १ एप्रिलपासून 'हा' नवा नियम लागू; आता देशात कुठेही मिळणार हक्काचं धान्य
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved