व्हॉट्सॲप एक नवीन फिचर आणत आहे, ज्यामुळे युजर्सना वाढदिवस लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही. या अपडेटनुसार, युजर्स आपल्या प्रोफाइलमध्ये जन्मतारीख सेव्ह करू शकतील आणि व्हॉट्सॲप त्या दिवशी रिमाइंडर देईल. सध्या हे फिचर अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे.

सध्याच्या काळात व्हाट्स अँप हे अँप मेसेजिंग प्लॅटफॉर्म प्रसिद्ध आहे. लोक आता त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. सध्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्टेट्स ठेवलं जात. आता त्यावर अँपमध्ये एक अपडेट येणार असून त्यामुळं वाढदिवस लक्षात ठेवावा लागणार नाही. त्यामधून आपल्याला वाढदिवसाच्या रिमाइंडर समजू शकणार आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हे नवीन फिचर काय काम करेल? 

व्हॉट्सॲप आपल्या प्रोफाइलमध्ये बर्थ डेट सेव्ह करता येणार आहे. एखाद्या युजरला आपला वाढदिवस त्यादिवशी व्हॉट्सॲपवर एक नोटिफिकेशन येणार आहे. त्यामुळं आपल्याला आता वाढदिवस लक्षात ठेवण्याची गरज पडणार नाही. युजरने त्यांच्या चॅट विंडोमध्ये एक वाढदिवसाचा प्रॉम्प्ट दिसू शकणार असून एका क्लिकवर हे ठेवू शकता.

व्हॉट्सॲप हा प्लॅटफॉर्म स्मार्ट होतोय 

व्हॉट्सॲप हा प्लॅटफॉर्म आता स्मार्ट होत चालला आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा प्लॅटफॉर्म आता आणखी स्मार्ट करणार आहे. हे अपडेट केवळ अँड्रॉइड बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध असणार आहे. या पद्धतीची चाचणी यशस्वी झाली तर हे स्पेसिफिकेशन सर्वांना वापरता येणार आहे. यावेळी तुमच्या प्रायव्हसीचा काळजी घेतली जाईल.