- Home
- Utility News
- Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; 1 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा 45000 रुपयांपर्यंत व्याज
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना; 1 लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा 45000 रुपयांपर्यंत व्याज
शेअर बाजाराच्या जोखमीशिवाय सुरक्षित परतावा शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) योजना एक उत्तम पर्याय ठरत आहे.

१ लाखाच्या गुंतवणुकीवर ४५,००० रुपयांपर्यंत फायदा
मार्केटमध्ये कसलीही आर्थिक झळ न सोसता सुरक्षित परतावा हवा असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची टाईम डिपॉझिट योजना (TD) बेस्ट ऑप्शन आहे. सरकारी आणि खाजगी बँकांच्या फिक्स डिपॉझिट (FD) सोबत तुलना केल्यास, पोस्ट ऑफिसचे व्याजदर अधिक आकर्षक आणि विश्वासार्ह आहेत.

गुंतवणुकीचा कालावधी आणि सध्याचे व्याजदर
पोस्ट ऑफिसमध्ये १, २, ३ आणि ५ वर्षे अशा चार वेगवेगळ्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिट (FD) करण्याचा पर्याय आहे. जसा गुंतवणुकीचा कालावधी वाढतो, तसा व्याजाचा परतावाही वाढतो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये लागू असलेले व्याजदर असे आहेत:
१ वर्षाचं डिपॉझिट: ६.९% वार्षिक व्याज
२ वर्षांचं डिपॉझिट: ७.०% वार्षिक व्याज
३ वर्षांचं डिपॉझिट: ७.१% वार्षिक व्याज
५ वर्षांचं डिपॉझिट: ७.५% वार्षिक व्याज
१ लाखाच्या गुंतवणुकीवर किती मिळेल मॅच्युरिटी रक्कम?
या योजनेत एखाद्याने १ लाख रुपये एकदाच गुंतवले, तर निवडलेल्या कालावधीनुसार मुदतीअंती मिळणाऱ्या मुद्दल आणि व्याजाचं संपूर्ण कॅल्क्युलेशन असं आहे:
१ वर्षाची गुंतवणूक: १ लाखाची गुंतवणूक १ वर्षासाठी केल्यास, ६.९% व्याजदरानुसार केवळ ७,०८१ रुपये व्याज मिळेल. मुदतीअंती एकूण १,०७,०८१ रुपये मिळतील.
२ वर्षांची गुंतवणूक: २ वर्षांसाठी पैसे ठेवल्यास ७% व्याजदरानुसार एकूण व्याज १४,८८८ रुपये होईल. मुदतीअंती गुंतवणूकदाराला १,१४,८८८ रुपये मिळतील.
३ वर्षांची गुंतवणूक: ३ वर्षांच्या डिपॉझिटसाठी ७.१% व्याज दिलं जातं. यात व्याजापोटी २३,५०८ रुपये मिळतील. परिणामी, ३ वर्षांनंतर मॅच्युरिटी रक्कम १,२३,५०८ रुपये असेल.
५ वर्षांची गुंतवणूक आणि टॅक्स बेनिफिट: ५ वर्षांच्या डिपॉझिटवर या योजनेत सर्वाधिक ७.५% व्याज मिळतं. या ५ वर्षांत जमा होणारी एकूण व्याजाची रक्कम ४४,९९५ रुपये असते. त्यानुसार, मुदतीअंती गुंतवणूकदाराला एकूण १,४४,९९५ रुपये मिळतील. शिवाय, इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत ५ वर्षांच्या डिपॉझिटवर टॅक्स सवलत मिळते. मात्र, मिळणाऱ्या व्याजावर लागू होणारा कर भरावा लागू शकतो.
गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवायचं?
दीर्घकाळासाठी पैसे गुंतवल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळतं हे यातून स्पष्ट होतं. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी आपले आर्थिक टार्गेट्स आणि भविष्यातील गरजेचा विचार करून योग्य कालावधी निवडायला हवा. तसेच, नवीन गुंतवणूक सुरू करण्यापूर्वी पोस्ट ऑफिसचे लेटेस्ट व्याजदर नक्की चेक करा.

