- Home
- Utility News
- VVCMC Recruitment 2026 : वसई-विरार महापालिकेत मेगा भरती 2026! NUHM अंतर्गत 145 पदांची संधी; 75 हजारांपर्यंत मासिक वेतन
VVCMC Recruitment 2026 : वसई-विरार महापालिकेत मेगा भरती 2026! NUHM अंतर्गत 145 पदांची संधी; 75 हजारांपर्यंत मासिक वेतन
VVCMC Recruitment 2026 : वसई-विरार महानगरपालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात १४५ पदांसाठी भरती जाहीर झाली. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, औषध निर्माता अशा विविध पदांचा समावेश आहे.

वसई-विरार महापालिकेत मेगा भरती
वसई-विरार महानगरपालिकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या भरतीद्वारे तब्बल 145 रिक्त पदे भरली जाणार असून, यासंदर्भातील अधिकृत जाहिरात पालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, महिला स्टाफ नर्स, औषध निर्माता यांच्यासह एकूण 11 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया नसून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
या भरती अंतर्गत खालीलप्रमाणे पदे आणि जागा उपलब्ध आहेत.
बालरोग तज्ज्ञ – 1
साथरोग तज्ज्ञ – 1
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक – 1
कार्यक्रम सहाय्यक – 1
औषध निर्माता – 2
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 3
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 10
महिला स्टाफ नर्स – 18
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 19
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 37
वैद्यकीय अधिकारी – 52
अशा प्रकारे एकूण 145 पदे भरली जाणार आहेत. भरतीबाबतची सविस्तर माहिती वसई-विरार महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शैक्षणिक पात्रता व वेतन
बालरोग तज्ज्ञ – MD Paed / DCH / DNB | वेतन: ₹75,000
साथरोग तज्ज्ञ – MBBS/BDS/AYUSH + MPH/MHA/MBA (Health) | ₹35,000
शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक – MBBS/BDS/AYUSH + MPH/MHA/MBA (Health) | ₹35,000
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS | ₹75,000
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – MBBS | ₹30,000
वैद्यकीय अधिकारी – MBBS | ₹60,000
महिला स्टाफ नर्स – GNM / B.Sc Nursing | ₹34,800
औषध निर्माता – D.Pharm / B.Pharm | ₹20,800
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc / DMLT | ₹20,800
कार्यक्रम सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी/इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. | ₹17,000
बहुउद्देशीय आरोग्य सेवक – 12 वी (विज्ञान) + पॅरामेडिकल/सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स | ₹18,700
वयोमर्यादा
बालरोग तज्ज्ञ, साथरोग तज्ज्ञ व विविध वैद्यकीय अधिकारी पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 70 वर्षे आहे. तर इतर पदांसाठी 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा लागू आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे.
मुलाखतीचे ठिकाण व तारखा
सर्व उमेदवारांना वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखत द्यावी लागणार आहे.
वैद्यकीय पदांसाठी मुलाखत
मुख्य कार्यालय, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
इतर पदांसाठी मुलाखत
मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
मुलाखतीची तारीख: 02 फेब्रुवारी ते 06 फेब्रुवारी 2026
ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटी कालावधीसाठी असणार असून, अर्जासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही.

