Vivo X200T : सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. तसेच बाजारात सातत्याने विविध प्रकारचे स्वस्त किंमतीतले सुद्धा स्मार्टफोन येत आहेत. त्यातच आता Vivo लवकरच भारतात X200T स्मार्टफोन सादर करणार आहे. 

नवी दिल्ली : सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. तसेच बाजारात सातत्याने विविध प्रकारचे स्वस्त किंमतीतले सुद्धा स्मार्टफोन येत आहेत. त्यातच आता Vivo लवकरच भारतात X200T स्मार्टफोन सादर करणार आहे. 91Mobiles ने दिलेल्या वृत्तानुसार, Vivo X200T स्मार्टफोनचा टीझर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर प्रसिद्ध झाला आहे. Zeiss कॅमेरा तंत्रज्ञानासह येणारा Vivo X200T मोबाईल, डिसेंबर 2024 मध्ये लाँच झालेल्या Vivo X200 आणि Vivo X200 Pro प्रमाणेच असेल. Vivo ने डिसेंबर 2025 मध्ये भारतात Vivo X300 सीरीजचे फोन सादर केले होते.

Vivo X200T फोनमध्ये काय अपेक्षित आहे?

Vivo X200T हा Vivo X200 आणि Vivo X200 FE स्मार्टफोनची वैशिष्ट्ये एकत्र असलेला 5G हँडसेट मॉडेल असेल. म्हणजेच, Vivo X200T हा एक असा फोन मॉडेल असेल जो कमी किमतीत फ्लॅगशिप-स्तरीय अनुभव देईल. Flipkart वर प्रसिद्ध झालेल्या टीझरमध्ये Vivo X200T मोबाईल फोनचे मागील डिझाइन स्पष्टपणे दिसत आहे. यामध्ये Vivo च्या फ्लॅगशिप मॉडेल्सप्रमाणेच कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. Vivo X200T हा OriginOS 6 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल.

रिपोर्टनुसार, Vivo X200T मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले असेल. हा फोन MediaTek Dimensity 9400+ चिपसेट, 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येईल. यामध्ये 6,200mAh क्षमतेची बॅटरी अपेक्षित असून, 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जरची चर्चा आहे. Vivo ने पुष्टी केली आहे की Vivo X200T स्मार्टफोन Zeiss कॅमेरा तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. तसेच, Vivo X200T फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा असेल, असेही संकेत मिळत आहेत.