शरिरात लाल रक्तपेशी तयार करणे, चयापचय क्रिया नियंत्रित करणे आणि मुख्य मज्जासंस्थेचे संरक्षण करणे यामध्ये व्हिटॅमिन बी12 महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या शरिरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
लाल रक्तपेशी तयार करणे, चयापचय क्रिया नियंत्रित करणे आणि केंद्रीय मज्जासंस्थेचे संरक्षण करणे यामध्ये व्हिटॅमिन बी12 प्रमुख भूमिका बजावते. आपल्या शरिरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत ते पाहूया.
1. जास्त थकवा आणि अशक्तपणा
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे काहींना जास्त थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
2. हात-पायांना मुंग्या येणे
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे हात-पायांना मुंग्या येऊ शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
3. नैराश्य, लवकर राग येणे
नैराश्य, लवकर राग येणे, विस्मरण यांसारखी लक्षणे देखील व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेचे संकेत असू शकतात.
4. त्वचा फिकट होणे, तोंडात फोड येणे
फिकट त्वचा, त्वचेवर पिवळेपणा, तोंडात फोड येणे ही सर्व व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे असू शकतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
5. मळमळ, उलट्या होणे
मळमळ, उलट्या, भूक न लागणे, अचानक वजन कमी होणे ही देखील व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेची लक्षणे आहेत.
6. दृष्टी कमी होणे, बोलण्यात अडचण
दृष्टी कमी होणे, बोलण्यात अडचण येणे आणि वागणुकीत बदल होणे यांसारख्या समस्या देखील यामुळे काही लोकांमध्ये उद्भवू शकतात.
टीप: वर नमूद केलेली लक्षणे दिसल्यास, स्वतः निदान करण्याचा प्रयत्न न करता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतरच रोगाची पुष्टी करा.


