- Home
- Utility News
- PM Vidya Lakshmi Yojana: करिअरच्या उड्डाणाला पैशांची अडचण येणार नाही!, 'या' योजनेअंतर्गत मिळवा १० लाखांपर्यंत एज्युकेशन लोन
PM Vidya Lakshmi Yojana: करिअरच्या उड्डाणाला पैशांची अडचण येणार नाही!, 'या' योजनेअंतर्गत मिळवा १० लाखांपर्यंत एज्युकेशन लोन
PM Vidya Lakshmi Yojana: पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गारंटरशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते. ही योजना भारत आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी असून, व्याजदरात सवलत आणि सोपी अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे.

PM Vidya Lakshmi Yojana: पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना गारंटरशिवाय १० लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते. ही योजना भारत आणि परदेशातील उच्च शिक्षणासाठी लागू असून, यामध्ये व्याजदरात सवलत आणि सोपी अर्ज प्रक्रिया उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांसाठी दिलासा, शिक्षणासाठी मोठं आर्थिक पाठबळ
देशातील लाखो होतकरू विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने एक महत्वाची आणि दिलासादायक योजना सुरू केली आहे. यामुळे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अर्धवट सोडण्याची भीती दूर होणार आहे.
पंतप्रधान विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज मिळू शकते. विशेषतः त्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे पण आर्थिक अडचणीमुळे स्वप्न अपूर्ण राहतं, त्यांच्यासाठी ही योजना संजीवनी ठरणार आहे.
योजनेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी
गारंटरशिवाय कर्ज: या योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्यासाठी कोणत्याही गारंटरची गरज नाही.
३९ राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभाग: देशातील सुमारे ३९ राष्ट्रीयीकृत बँका या योजनेशी संलग्न आहेत.
७.५ लाख रुपयांपर्यंत सरकारची हमी: केंद्र सरकार ७.५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ७५% क्रेडिट गॅरंटी देते, त्यामुळे बँकांना विश्वास आणि विद्यार्थ्यांना मदत मिळते.
कोण लाभ घेऊ शकतो?
अर्जदार भारतीय नागरिक असावा.
१०वी आणि १२वीत किमान ५०% गुण असावेत.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
विद्यार्थी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत प्रवेशित असावा.
व्याजदरातील सवलत
८ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना व्याजदरात ३% ची सवलत मिळते.
४.५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना याआधीपासूनच लागू असलेल्या योजनांतून अतिरिक्त सवलत मिळते.
अर्ज प्रक्रिया
इच्छुक विद्यार्थी Vidya Lakshmi Portal वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अर्ज भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रे अपलोड करून लोनसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो.
लोन मंजूर झाल्यानंतर विद्यार्थी शिक्षण सुरू करू शकतात.

