Pradhan Mantri Vishwakarma Yojana: प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही पारंपरिक कौशल्यांमध्ये काम करणाऱ्या १८ प्रकारच्या कारागिरांना आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षण देते.

Pradhan Mantri Vishwakarma Yojana: केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. या योजनांमधून लाखो लाभार्थ्यांना थेट मदत मिळते. प्रत्येक योजनेसाठी वेगवेगळे पात्रता निकष ठरवले गेले आहेत, ज्यांचा उद्देश म्हणजे गरजूंना थेट लाभ पोहोचवणे. अशाच योजनांमध्ये एक योजना आहे जी सध्या देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. या योजनेमुळे नागरिकांचे केवळ आर्थिक सशक्तीकरण झाले नाही, तर त्यांना व्यवसायासाठी एक ठोस आधार देखील मिळाला आहे. चला तर मग जाणून घेऊया की ही योजना नेमकी कोणती आहे, तिचे फायदे आणि पात्रता काय आहे?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना म्हणजे काय? पात्रता काय?

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र सरकारने 2023 साली सुरू केली होती. या योजनेचा उद्देश पारंपरिक कौशल्यांमध्ये काम करणाऱ्या 18 प्रकारच्या कारागिरांना थेट लाभ देणे हा होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे. योजना प्रामुख्याने खालील पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांसाठी आहे.

मूर्तिकार

सोनार

लोहार

राजमिस्त्री

खेळणी बनवणारे कारीगर

धोबी

दरजी

न्हावी (केस कापणारे)

माळा बनवणारे

सुतार

टोपल्या तयार करणारे

चटया विणणारे

झाडू बनवणारे इत्यादी

ही कामे करणाऱ्या लोकांना या योजनेचा थेट लाभ मिळू शकतो.

15,000 रुपये केव्हा मिळतात?

या योजनेत सामील झाल्यावर सर्वप्रथम संबंधित कामात प्रशिक्षण (training) दिले जाते. प्रशिक्षण चालू असताना लाभार्थ्याला रोज 500 रुपये देण्यात येतात. याशिवाय इतर फायदेही मिळतात. तसेच सरकारकडून लाभार्थ्याला सुरुवातीला 15,000 रुपये दिले जातात. याचा उपयोग कामासाठी आवश्यक असलेले टूलकिट (साधनं) खरेदी करण्यासाठी होतो. कारण कोणत्याही कुशल कारागिरासाठी योग्य साधनं असणे अत्यंत गरजेचे असते.

कर्जाची सुविधा कशी मिळते?

जर एखाद्या व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर सरकारकडून त्यांना 1 ते 3 लाख रुपये पर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज कमी व्याजदरावर दिले जाते. सुरुवातीला मिळालेलं कर्ज परत केल्यावर, त्यांना आणखी जास्त रकमेचं कर्ज मिळू शकतं, जेणेकरून ते आपला व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवू शकतील आणि आत्मनिर्भर बनू शकतील.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही देशातील पारंपरिक कौशल्य असणाऱ्या कारागिरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. सरकारी सहाय्य आणि प्रशिक्षणामुळे हे लोक आता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतात. योजनेच्या माध्यमातून ‘वोकल फॉर लोकल’ यासारख्या उपक्रमांनाही चालना मिळते.