सार

TRAI च्या नव्या नियमांमुळे टेलिकॉम कंपन्यांनी स्पॅम कॉलबद्दल योग्य माहिती न दिल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर 10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाणार आहे. स्पॅम कॉलचा क्रमांक देऊन आणि अ‍ॅपमध्ये स्क्रिन शॉट शेअर करुन तक्रार करू शकता. 

TRAI New Rules for Spam Call : टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने स्पॅम कॉल आणि मेसेजपासून ग्राहकांची सुटका होण्यासाठी यासंबंधित काही नियमांमध्ये बदल केले आहेत. ग्राहकांना आधीच्या तुलनेत आता स्पॅम कॉल किंवा मेसेजबद्दल अगदी सहजतक्रार करता येणार आहे. या तक्रारींनुसार कार्यवाही न केल्यास टेलिकॉम कंपन्यांना दंड भरावा लागू शकतो. कंपन्यांकडून स्पॅम कॉलबद्दल माहिती न दिल्यास किंवा नियमांचे पालन न केल्यास 2-10 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

ट्रायच्या बुधवारच्या अधिसुचनेनुसार, कमर्शियल मेसेज ओखळण्याबद्दलच्या काही गोष्टींमध्ये बदल करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, प्रमोशनल मेसेजच्या पुढे P असे लिहिलेले असेल. याशिवाय सेवा संबंधित मेसेजच्या पुढे S लिहिलेले असेल. अशी व्यवस्था टेलिकॉम कंपन्यांना करावी लागणार आहे.

अशी करू शकता तक्रार

नवे नियम पुढील 30-60 दिवसांमध्ये लागू होणार आहेत. नव्या नियमांनुसार, सर्व टेलिकॉम कंपन्यांना आपल्या अ‍ॅप किंवा पोर्टलवर स्पॅम कॉलच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जागा द्यावी, जेणेकरुन ग्राहकांना तक्रार करता येईल. याशिवाय ग्राहकांकडून तक्रारीसाठी आवश्यक माहिती देखील मागावी. ग्राहक टेलिकॉम कंपन्यांना ईमेलच्या माध्यमातूनही तक्रार करू शकतात. अशातच आता स्पॅम कॉलसंदर्भात तक्रार सात दिवसात केली जाऊ शकते. याआधी तीन दिवसांचा कालावधी दिला जात होता.

हेही वाचा : 

WhatsApp Chat लीक होण्याची भीती वाटतेय? येथे पाहा सेटिंग्स

JEE Main २०२५ परीक्षा परिणाम: १४ विद्यार्थ्यांना १०० NTA गुण, टॉपर्सची यादी

5 दिवसात टेलिकॉम कंपन्यांना करावी लागणार तक्रार

केवळ स्पॅम कॉलचा क्रमांक देऊन आणि अ‍ॅपमध्ये स्क्रिन शॉट शेअर करुनही तक्रार करू शकता. पाच दिवसांमध्ये स्पॅम कॉल करणाऱ्यांच्या विरोधात कार्यवाही करावी लागणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांचा कालावधी दिला जात होता. एखाद्याच्या विरोधात 10 दिवसांमध्ये तक्रार आल्यास कंपन्यांना त्याचा क्रमांक ब्लॉक करणे आणि ब्लॅक लिस्टमध्ये टाकणे अशी कार्यवाही करावी लागणार आहे.

जर एखाद्या ग्राहकाने कमर्शियल मेसेज येऊ नये असा पर्याय निवडला असल्यास 90 दिवसांच्या आधी कोणतीही प्रमोशन कंपनी ग्राहकाची सहमती मागणार नाही. टेलिकॉम कंपन्यांना प्रमोशनल किंवा कर्मशियल मेसेज मिळेल असा ऑप्शन ग्राहकांना द्यावा लागणार आहे. सध्या ही सुविधा दिली जात नाही.

आणखी वाचा : 

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कर्ज: डाउन पेमेंट किती?